काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील नाशिकमध्ये अपक्ष लढणार

नाशिक : नाशिक मध्य मतदार संघात शिवसेना उबाठा सेनेला जागा सोडल्याने नाराज झालेल्या काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी निवडणुकीत उतरण्याचा निर्धार व्यक्त करत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे.


गेल्या निवडणुकीत डॉ. पाटील यांनी ऐनवेळी उमेदवारी जाहीर केल्यावरही तब्बल ४० हजारपेक्षा जास्त मते प्राप्त केली होती. त्यामुळे या निवडणुकीत लढण्याचा अधिकार आपलाच असल्याचा दावा त्यांनी केला होता; मात्र सदर जागा सोडून वसंत गीते यांना येथे उमेदवारी देण्यात आली आहे.


नाशिक शहरात काँग्रेसला चारपैकी एकही जागा न सोडल्याने संतप्त झालेल्या काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी काँग्रेस भवनला टाळे ठोकत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर शुक्रवारी डॉ. पाटील यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट करत आपण निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर करत असल्याचे जाहीर केले.


या पोस्टमध्ये डॉ. पाटील यांनी म्हटले आहे की, गेली ३० वर्षे पक्षाचे काम अत्यंत निष्ठेने करत आहे. गेल्या निवडणुकीत माझी कोणतीही तयारी नसताना ऐनवेळी पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचे आदेश दिले आणि मी केवळ १२ दिवसांमध्ये तब्बल ४६३०० मते मिळवली. आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून कॉंग्रेसने मला आश्वासन दिले होते. परंतु शेवटच्या क्षणी ही जागा उबाठा गटाला सोडली. पक्षाला संपूर्ण नाशिक शहरामध्ये चारपैकी एकही जागा वाट्याला आलेली नाही, हे दुर्दैव. म्हणूनच मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याचा निश्चय केला आहे. मतदारसंघाची गेल्या दहा वर्षात झालेली वाताहत डोळ्यांसमोर पहाताना वेदना होत आहेत.

Comments
Add Comment

पुण्यात पोलीस हवालदारानं मुलीच्या पहिल्या वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल

पुणे : 'तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा होता पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देतात. यामुळे

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

बहरीनमध्ये जय पवारांचा विवाह; ‘झिंगाट’वर अजितदादा-रोहित पवार यांचा ठेका

बहरीन : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये

तेजश्री प्रधानला राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार

मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या तिची मालिका 'वीण दोघांतली ही तुटेना'मुळे चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेत ती

शिल्पा शिरोडकरचा ‘बिग बॉस १९’ फेम मराठमोळ्या प्रणीत मोरेला पाठिंबा

‘बिग बॉस’ हिंदीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. ‘बिग बॉस’मधून अलीकडेच

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या