रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'झी' चे खास पत्र

मुंबई: झी मराठी वाहिनीने आतापर्यंत अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. आभाळमाया, वादळवाट अशा अनेक अजरामर मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. झी मराठीसोबत प्रेक्षकांच जुन अतुट नात आहे. त्याच नात्यासाठी झी मराठीने त्यांच्या प्रेक्षकांच्या २५ वर्षांच्या प्रवासासाठी धन्यवाद म्हटलंय.

झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये वाहिनीवरील अनेक जुन्या आणि अजरामर मालिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान संकर्षण कऱ्हाडेने झी मराठीकडून प्रेक्षकांना लिहिलेल्या खास पत्राचं वाचन झी मराठीच्या मंचावर केलंय.


झी मराठीचं खास पत्र


झी मराठीच्या पत्रात म्हटलं की, 'प्रिय प्रेक्षकहो...२५ वर्ष एवढी मोठी गोष्ट आहे. आता काळजात काय काय उचंबळून येतंय हे सांगणं कठीण आहे. आयुष्याचा हा एका असा प्रवास आहे जो आपण एकत्र सुरु केला होता, आज त्याच प्रवासाने पंचवीशी गाठली आहे. आज २५ वर्षांनी मनात हा विचार येतोय की, आपण या दोघांमधलं नात म्हणजे नेमकं काय नातं आहोत? मी तुमची सकाळ जागवणारा वासुदेव आहे, मी तुमचा न्याहारीचा डब्बा भरुन देणारा साथीदार आहे...का दुपारी ऊन डोक्यावर आलं तर शांत निजवणारी आई आहे..'

'संध्याकाळी तुमच्यासोबत बागडणारा उनाड सवंगडी आहे...का बागडून झालं की घरी परत आणणारे आजोबा आहे..अभ्यासाला बसवणारा बाप आहे..का रात्री गोष्ट सांगत शांत निजवणारी आज्जी आहे.. उत्तर हे आहे की, आपल्यातलं नातं हे यातलं सगळंच थोडं थोडं आहे...या २५ वर्षात तुम्ही गोष्टी बघताना तुम्ही हसला असाल,लाजला असाल, तुमच्या डोळ्यांच्या कडाही पाणवल्या असतील.. पण आपण प्रत्येक भावनेचा केला सोहळा, प्रत्येक भावना सोबतीने जगलो..आम्ही नवीन गोष्टींना कायम तुमच्या समोर घेऊन येत राहू.. काय असतं गोष्टींना कान मिळाले, नुसते कान नाही, गोष्टींना ऐकणारे कान मिळाले की, गोष्टींमधली पात्र श्वास घेत राहतात आणि तो श्वास तुम्ही आहात.. हा श्वास निरंतर चालू राहू दे हिच निर्मिताकडे प्रार्थना करतो, मनापासून खूप मनापासून खूप खूप धन्यवाद... तुमचीच लाडकी वाहिनी झी मराठी...'
Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये