महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोखाडा (वार्ताहर) :निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, काल २४ रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते. हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून येता २८ तारखेला माझ्या माय बाप जनतेच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.


विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून तशा हालचाली सुरू आहेत अशावेळी महाविकास आघाडीकडून भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे असताना दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार आणि पक्षही ठरलेला नसल्याने महावीकास आघाडीच्या सुनिल भुसारा यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून राज्य स्तरावरून उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याचे चित्र असले तरी सुनील भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म भरला.

Comments
Add Comment

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Amit Shah : विद्यार्थी आंदोलनावरील चर्चेसाठी सरकार तयार, गृहमंत्री अमित शाह देणार उत्तर; संसदेतील कोंडी सुटण्याचे संकेत

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आणि सरकारमधील संघर्ष टोकाला ग

Nitesh Rane : दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार, नाहीतर 'या' सणाच्या मुहूर्तावर सरकारकडून धमाकेदार ओवाळणी!

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या पात्र लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी

Nitesh Rane : वंदे मातरम न म्हणणाऱ्या मदरशांची नोंदणी रद्द करा

- मंत्री नितेश राणे; त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची गरज मुंबई : ज्या संस्थांमध्ये किंवा मदरशांमध्ये 'वंदे

Navnath Ban : टमटममध्ये बसलेल्या चार प्रवाशांसारखी उबाठाची अवस्था होईल; भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

मुंबई : संजय राऊत हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ मालिकेचा पुढचा भाग सादर करून सत्तेत येण्याचे स्वप्न पुन्हा बघत