महाविकास आघाडीकडून सुनील भुसारा यांनी भरला उमेदवारी अर्ज

मोखाडा (वार्ताहर) :निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, काल २४ रोजी विक्रमगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील भुसारा यांनी सर्वात अगोदर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उबाठा, काँग्रेस, सीपीएम, कष्टकरी संघटना अशा सर्व पक्षांचे जिल्हा तालुका प्रमुख संघटना सचिव आदी उपस्थित होते. हा उमेदवारी अर्ज प्रातिनिधिक स्वरूपाचा भरलेला असून येता २८ तारखेला माझ्या माय बाप जनतेच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे यावेळी भुसारा यांनी सांगितले.


विक्रमगड विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून तशा हालचाली सुरू आहेत अशावेळी महाविकास आघाडीकडून भुसारा यांनी सर्वात आधी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे असे असताना दुसरीकडे महायुतीकडून अद्यापही उमेदवार आणि पक्षही ठरलेला नसल्याने महावीकास आघाडीच्या सुनिल भुसारा यांच्या विरोधात नेमका कोण उमेदवार असेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून राज्य स्तरावरून उमेदवार यादी जाहीर केलेली नसल्याचे चित्र असले तरी सुनील भुसारा यांनी पक्षाच्या एबी फॉर्म भरला.

Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' जाहिराती मित्र पक्षाच्या एका मंत्र्याने दिल्या, रोहित पवारांचा दावा

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर

आमदार गोपीचंद पडळकरांनी मनोज जरांगेंना धमकावले

पुणे : धनगर समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वापरलेल्या अपशब्दांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र निषेध केला.

बीडमधील समाजिक समतेविषयी काय म्हणाले धनंजय मुंडे ?

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे राजकारणात पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांनी बीड जिल्ह्यातील

निवडणूक आयोगाची ४४ राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (केंद्रीय निवडणूक आयोग) ४४ राजकीय पक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या पक्षांची

'शब्दांची हेराफेरी केली', भुजबळांचा सरकारला थेट इशारा; 'हैदराबाद गॅझेट'वरून आक्रमक

मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काढलेल्या 'हैदराबाद गॅझेट'च्या जीआरवरून राज्य

जरांगेंच्या आंदोलनामुळे ज्या मालमत्तेचे नुकसान झाले त्याची भरपाई कोण करणार ?

मुंबई : मनोज जरांगे यांच्या नेतृत्वातले आंदोलन संपले. पण या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेच जे नुकसान झाले आहे,