मुंबई : अतरंगी भूमिकेमुळे लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) आनंदाची बातमी दिली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (MHJ) फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे. लग्नाची कोणतीही माहिती न देता थेट लग्नाचे फोटो शेअर करत पृथ्वीकने सर्व चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
प्राजक्ता वायकुळ असे पृथ्वीकच्या पत्नीचे नाव असून यांनी आज साधेपणाने लग्न केलं आहे. हे दोघे एकमेकांना डेट करत असून आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वीकने गुपचूप लग्न उरकल्यामुळे सगळेच आश्चर्य झाले आहेत.
“२५-१०-२०२४. एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!”, असं कॅप्शन देत पृथ्वीकने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर चाहते आणि कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…