मुंबई: संत्रे हे एक असे रसदार फळ आहे जे अनेकांना आवडते. संत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात तसेच खायलाही अतिशय चांगले लागते. संत्र्यामुळे त्वचा सुरकुत्या फ्री होते आणि शरीर स्वस्थ बनते. हे फळ खाण्याचे खूप फायदे आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का की संत्र्याच्या सालीही तितक्याच पौष्टिक आहेत.
जी साले तुम्ही कचरा म्हणून फेकता ते त्यात अनेक पोषक गुण आहेत. जाणून घेऊया संत्र्याच्या सालींचे फायदे…
संत्र्याच्या सालींना अँटीऑक्सिडंट्सचे पावरहाऊस म्हटले जाते. हे खाल्ल्याने शरीर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून लढण्यासाठी मजबूत बनते. यासोबतच सूजेची समस्याही कमी होते.
संत्र्यामधील व्हिटामिन सी आपल्या हृदयासाठी अतिशय चांगले आहे. एका अभ्यासानुसार संत्र्याची साले खाल्ल्याने हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.
संत्र्यामध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. मात्र या फळांच्या सालीमध्ये अधिक प्रमाणात व्हिटामिन सी अधिक आढळते. अशातच तुम्ही जर संत्र्याच्या साली खात असाल तर यामुळे इम्युनिटी मजबूत होते.
संत्र्याच्या सालीमध्ये पेक्टिन आहे हे डायजेशनसाठी फायदेशीर आहे. अशातच हे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
डायबिटीजने त्रस्त असलेल्या लोकांसाठी संत्र्याची साले वरदान ठरू शकतात. यातील फायबर कंटेट साखरेचे शोषण कमी करतात. यामुळे साखर कंट्रोलमध्ये राहते.
अशातच तुम्ही जर संत्र्याची साले फेकून देत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. हे फेकण्याऐवजी तुम्ही डाएटमध्ये सामील करू शकता.
संत्र्याची साले पाण्यात उकळवून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. याशिवाय तुम्ही ते सुकवून पावडर बनवू शकता. तसेच ती पावडरही खाऊ शकता. तसेच संत्र्याची साले किसून तुम्ही एखाद्या डेझर्टवर टाकू शकता.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…