Bhoolbhulaiya 3: 'भूलभुलैया ३' च्या गाण्यामध्ये विद्या-माधुरी यांच्यात काँटे की टक्कर

मुंबई: यंदाची दिवाळी 'भूलभुलैया' असणार आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रूहबाबाच्या अवतारात तुम्हाला दिसणार आहे. यावेळेस भूलभुलैया ३मध्ये बरंच काही वेगळं पाहायला मिळणार आहे. विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल. आमी जे तोमार ३.० व्हर्जनमध्ये यावेळेस दोन्ही अभिनेत्री आमनेसामने येत आहेत.



रिलीज झाले 'आमी जे तोमार ३.०' गाणे


सिनेमाच्या रिलीजच्या काही दिवस आधीच निर्मात्यांनी यूट्यूबवर आमी जे तोमार हे गाणे रिलीज केले आहे. यात विद्या आणि माधुरी यांचा जबरदस्त फेसऑफ दिसत आहे. दोघीही अतिशय शानदार डान्स करत आहेत. एकमेकींना टक्कर देत आहेत. विद्याने काळी आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. केसांमध्ये गजरा माळला आहे. तर माधुरी लाल रंगाच्या अनारकली सूटमध्ये दिसत आहे. दोघींनी घुंगरू घातले असून त्या डान्स करत आहेत.



गाण्याची एक झलक



आमी जो तोमार हे त्याच व्हर्जनचे गाणे आहे जे प्रेक्षकांनी २००७मध्ये भूलभुलैया सिनेमात मंजुलिकाला नाच करताना पाहिले होते. यात विद्या बालन एकटीच होती. मात्र यावेळेस माधुरी दीक्षित सोबत दिसत आहे. चाहते हे गाणे पाहिल्यावर खूपच एक्सायटेड झाले आहेत. हे गाणे गीतकार प्रीतम यांनी कंपोज केले आहे. तर श्रेया घोषालचा आवाज आहे.

Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने