पेण : पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदार संघातून शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल नंदकुमार म्हात्रे यांना निवडून देण्यासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शपथ घेतली आहे. आज रायगड किल्ल्यावरून अतुल म्हात्रे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह आपल्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला.
“छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणांनी संपूर्ण रायगड परिसर दुमदुमला होता. पेण-सुधागड-रोहा विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाकडून अतुल म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने शेकाप व आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.
यावेळी रायगडावर जि.प.सदस्य सुरेश खैरे, माजी सरपंच महेंद्र ठाकूर, रोशन पाटील, प्रल्हाद पाटील, निलेश म्हात्रे, दिपक पाटील, एन.जी.ठाकूर, राजन झेमसे, नरेंद्र पाटील, नमिता म्हात्रे, महाबळे, राजेश पाटील, सुनील वाघमारे, मंगेश पाटील, वैभव पाटील, विकी पाटील, तेजस पाटील, खाडेकर गुरुजी, नासीर भाई आदी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…