राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी सुट्टी असणार आहे. यासाठी मतदानासाठी सुट्टी देण्याबाबत सरकारने परिपत्रक जाहीर केले आहे.


महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर म्हणजे मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. राज्यातील सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शासनाने सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.


राज्यातील विविध मतदारसंघातील व्यवसाय, व्यापार, औद्योगिक उपक्रम आणि इतर कोणत्याही आस्थापनेत कार्यरत असणाऱ्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार आहे. यानुसार, उद्योग विभागात येणाऱ्या उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या आणि संस्था किंवा इतर आस्थापनांना हे शासन परिपत्रक लागू राहील. या दिवशी सुट्टी मंजूर झाल्याने या व्यक्तीच्या पगारात कोणतीही कपात केली जाणार नाही.

Comments
Add Comment

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील

'नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी'

नाशिक : नाशिक जिल्ह्यात २०२७ मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात फक्त हिंदूंचीच दुकानं हवी. कुंभमेळ्याला

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत