Panipuri Movie : लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट! ‘पाणीपुरी’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : चटकदार पाणीपुरी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आता अशाच वेगवेगळ्या चवींची चटकदार पाणीपुरी लवकरच चित्रपटगृहात प्रेक्षकांना चाखायला मिळणार (Panipuri Movie) आहे. नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत जोड्यांच्या प्रेमाची परिणीती आणि त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा या 'पाणीपुरी' चित्रपटामध्ये दाखवली जाणार आहे. नुकताच या चित्रपटाचा मजेशीर टिझर रिलीज झाला असून प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिसाद दिला आहे.


लेखन-दिग्दर्शन रमेश चौधरी आणि एस.के प्रॉडक्शन निर्मित ‘पाणीपुरी’ हा मराठी चित्रपट येत्या १५ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


या चित्रपटामध्ये अभिनेता कैलास वाघमारे, हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब, अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, ऋषिकेश जोशी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव, सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे तरुण चेहरे यात धमाल करणार आहेत. त्याचबरोबर अभिनेता मकरंद देशपांडे, सायली संजीव, विशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार देखील कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत.


संजीवकुमार अग्रवाल या चित्रपटाचे निर्माते असून चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत.

Comments
Add Comment

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये

'दशावतार' सिनेमा पाहिल्यावर काय म्हणाले राज ठाकरे? पाहा Video

मुंबई: सध्या महाराष्ट्राच्या सिनेमाघरांमध्ये दशावतार या सिनेमाची चर्चा सुरू आहे. दशावतार सिनेमा

दशावतारान गाजवल्यान थिएटर!

५ कोटी २२ लाख कमाई, सगळीकडे शोज हाऊसफुल्ल ! Dashavtar Box Office Collection:  मराठी सिनेसृष्टीतील सर्वात भव्य चित्रपट म्हणून गाजत