Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीGold Silver Price Hike : सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ! सणासुदीच्या काळात...

Gold Silver Price Hike : सोनं चांदीच्या दरात पुन्हा वाढ! सणासुदीच्या काळात ८० हजारांचा आकडा पार

पाहा काय आहेत सध्याचे दर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अशातच सध्या सणासुदीचा काळ सुरु असून या कालावधीत अनेकजण सोनं- चांदी करतात. मात्र साततत्याने वाढत चाललेल्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. पाहा बाजारात काय आहेत आजचे दर.

आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ४५० रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर ७८ हजार १७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. तसेच चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे २ हजार ८०० रुपयांची वाढ झाली.

दरम्यान, दिवाळी सण अवघ्या १० दिवसांवर येवून ठेपला आहे. धनतेरस, भाऊबीज या सणांच्या मुहूर्तावरही लोक सोनं खरेदी करतात. त्यामुळे सोनं चांदीच्या दरात घट होणार की दराचा उच्चांक वाढणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -