जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट 'अंत्यआरंभ'!

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : किरणमयी आर कामथ निर्मित "अंत्यआरंभ" हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन सुप्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः आजवर बनविले आहेत.


"अंत्यआरंभ" हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ. रमेश कामठ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ, विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. कॅमेरामन पीव्हीआर स्वामी, संगीत सुप्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचे आहे. संवाद लेखन श्री कृष्ण राव ह्यांचे आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments
Add Comment

'Raja Shivaji' Movie : ‘राजा शिवाजी’ची विक्रमी घोडदौड! १७ व्या दिवशी तगडी कमाई, आता ‘सैराट’च्या रेकॉर्डवर नजर

मुंबई : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागोमाग एक विक्रम मोडत आता नवा इतिहास

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू

Indian Musician Death : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ तबला वादक उस्ताद साबिर खान यांचं निधन

कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी. प्रख्यात तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे

Mouni Roy-Suraj Nambiar Divorce : “आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…”; अखेर मौनी रॉयने घटस्फोटावर मोडलं मौन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्या

Ruchira Jadhav : काळ्या ब्लेझरमध्ये रुचिरा जाधवचा बोल्ड अंदाज; कॅप्शनचीही चर्चा

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिचं नाव घेतलं जातं.