'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांचे जीवन, अध्यात्म आणि स्वामी भक्ती यांचा सुंदर संगम असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने महाराष्ट्रासह जगभरातील प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ घातली आहे.


चित्रपटातील गाणी, प्रभावी कथा, दमदार संवाद आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर (Box Office) सातत्याने कमाई करत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी साकारलेली स्वामींची भूमिका विशेष गाजत असून अभिनेत्री स्नेहल तरडे महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे.



'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १७


Sacnilk च्या अहवालानुसार, प्रदर्शनाच्या १७ व्या दिवशी 'देऊळ बंद २' ने १,११७ शोमधून तब्बल २.६० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यानंतर चित्रपटाची भारतातील एकूण नेट कमाई ५६.६० कोटी रुपयांवर पोहोचली असून ग्रॉस कलेक्शन ६६.५६ कोटी रुपये झाले आहे.


वीकेंडमध्ये (Weekend) चित्रपटाच्या कमाईला चांगलीच चालना मिळाली आहे. सध्या चित्रपटाचा तिसरा आठवडा सुरू असून येत्या काही दिवसांत तो आणखी मोठा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन आठवड्यांत या चित्रपटाने जगभरात ६०.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.


'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन


- दिवस १ – ३.०५ कोटी रुपये


- दिवस २ – ३.११ कोटी रुपये


- दिवस ३ – ५.२१ कोटी रुपये


- दिवस ४ – ६.१० कोटी रुपये


- दिवस ५ – ३.७० कोटी रुपये


- दिवस ६ – ३.३५ कोटी रुपये


- दिवस ७ – ३.६० कोटी रुपये


- दिवस ८ – ४.५५ कोटी रुपये


- दिवस ९ – ३.१० कोटी रुपये


- दिवस १० – ५.०० कोटी रुपये


- दिवस ११ – ५.७५ कोटी रुपये


- दिवस १२ – २.६० कोटी रुपये


- दिवस १३ – २.३५ कोटी रुपये


- दिवस १४ – १.८० कोटी रुपये


- दिवस १५ – १.८० कोटी रुपये


- दिवस १६ – १.४० कोटी रुपये


- दिवस १७ – २.६० कोटी रुपये



एकूण नेट कलेक्शन


५६.६० कोटी रुपये


बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणारा 'देऊळ बंद २' आता १०० कोटींच्या टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. रविवारी चित्रपट किती कमाई करतो आणि पुढील आठवड्यात त्याचा वेग कायम राहतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Shubha Godbole Cancer : मेधा मांजरेकर नंतर 'या' जेष्ठ अभिनेत्रीने केला 'केमो कर्ल्स'मधून आपल्या कॅन्सरचा उलगडा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी कॅन्सरशी

Eetha Movie : 'इठा' चित्रपटावर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार! विठाबाईंच्या कुटुंबीयांचा संताप; म्हणाले, "इतिहासाची मोडतोड खपवून...

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी 'इठा' (Eetha) चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. हा

Star Pravah New Serial : 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ऐश्वर्या नारकर यांचं ८ वर्षांनी स्टार प्रवाहवर पुनरागमन; नव्या मालिकेत साकारणार हाडाच्या शिक्षिकेची भूमिका

मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या

Ratris Khel Chale Actress : ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंतांमध्ये नवा वाद! कृतिका तुळसकरने अपूर्वा नेमळेकरला ठणकावलं

मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर

Amitabh Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यावर शस्त्रक्रिया; ICU मध्ये उपचारानंतर डिस्चार्ज, ब्लॉगमधून दिली प्रकृतीची माहिती

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रकृती

Weekend Watchlist : या आठवड्यात ओटीटीवर काय पाहणार? ८ नव्या चित्रपट-वेब सिरीजची यादी

मुंबई : या आठवड्यात ओटीटीवर (OTT) काय पाहायचं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर ही यादी तुमच्यासाठीच आहे. २० ते २६