जीवनाचे सार सांगणारा कोकणी चित्रपट 'अंत्यआरंभ'!

लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : किरणमयी आर कामथ निर्मित "अंत्यआरंभ" हा नवीन कोकणी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य क्रिएशन्स बॅनरच्या अंतर्गत करण्यात आली असून ह्याचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन सुप्रसिद्ध कर्नाटक कोकणी साहित्य अकादमी आणि अनेक पुरस्कारप्राप्त डॉ. रमेश कामथ यांनीच केले आहे. एफटीआय पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण घेतले असून एकूण ८ कोकणी चित्रपटातील ४ कोकणी चित्रपट हे त्यांनी स्वतः आजवर बनविले आहेत.


"अंत्यआरंभ" हा एक जीवनाचे सार सांगणारा चित्रपट असून प्रत्येक शेवट ही एक नवीन सुरुवात असते असा संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. डॉ. रमेश कामठ, दामोदर नायक, प्रतीक्षा कामथ, विठोबा भांडारकर, स्टेनी अल्वारेस, उदय जादूगार, अनंत नायक आदी कलाकारांच्या भूमिका आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. कॅमेरामन पीव्हीआर स्वामी, संगीत सुप्रसिद्ध गायक शंकर शानभोगे ह्यांचे आहे. संवाद लेखन श्री कृष्ण राव ह्यांचे आहे. कर्नाटक येथील मर्कारा येथे चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून प्रेक्षकांना निसर्गाचा मनमुराद आनंद या चित्रपटातून घेता येणार आहे येत्या नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments
Add Comment

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल; नेमके काय झाले ?

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र सध्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत.

मन्नत मध्ये रूम मिळेल का? या प्रश्नावर शाहरुख खानचे "हे" मिश्किल उत्तर

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याने गुरुवारी ऑक्टोबर २०२५ रोजी त्याच्या ट्विटर पेजवर 'Ask SRK' सेशन ठेवत

'मुक्काम पोस्ट देवाचं घर' सिनेमाची फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड

मुंबई : मागील काही वर्षात मराठी चित्रपटांची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. नुकताच 'नाळ २' या सिनेमाला

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे ‘बिग बॉस१९’च्या घराचा नवा कॅप्टन !

मुंबई : ‘बिग बॉस १९’ रिऍलिटी शो चांगलाच गाजत आहे. रोज नवे वाद,प्रेम आणि राजकारण या शो मध्ये पाहायला मिळतंय. याच शो

गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं नेमकं चाललंय तरी काय?

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात सध्या एक नव्या जोडीची चर्चा रंगली आहे ‘इंडियन आयडॉल’ फेम अभिजीत सावंत आणि लोकप्रिय