Wednesday, December 4, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यफसलेलं बेस्टच कंत्राटीकरण

फसलेलं बेस्टच कंत्राटीकरण

गेल्याच आठवड्यात मुंबईकर प्रवाशांसाठी एक वाईट बातमी ठरली. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा व सोयीच्या असलेल्या बेस्ट उपक्रमातील एका खाजगी कंत्राटदाराने आपल्या २८० बस काढून घेण्याचा निर्णय घेतला आणि बेस्टची बस सेवा ठप्प करून टाकली. त्यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव विभागातील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एका रात्रीत कंत्राटदाराने आपली सेवा अचानक थांबवणे हे अत्यंत धोक्याचे असून कोणतेही योग्य नियोजन न करता बेस्टमध्ये कंत्राटीकरण कशाप्रकारे फसले आहे त्याचे हे योग्य उदाहरण ठरेल.

मुंबई डॉट कॉम – अल्पेश म्हात्रे

एखाद्या कंत्राटदाराने कंत्राट रद्द करून जाणे हे बेस्टसाठी काही नवीन गोष्ट नाही. याआधी पीएनएम ग्रुप व एम पीजी ग्रुप यांनी कोणत्याही अटी शर्तींचे पालन न करता अचानक बेस्टमधून एक्झिट घेतली होती आता तिसऱ्यांदा हंसा सिटी बस या कंत्राटदाराने एका रात्रीत परवडत नसल्याचे कारण देत आपली बस सेवा अचानक बंद केली त्याने लाखो प्रवाशांचे हाल, तर झालेच; परंतु त्यात काम करणारे बाराशे कर्मचारी एका रात्रीत बेरोजगार झाले. तसेच आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बेस्टमधील आणखी एक कंत्राटदार दिवाळीनंतर आपली बस सेवा थांबवणार असल्याचे कळते आहे. त्यामुळे बेस्टची सेवा मुंबईमध्ये पूर्णपणे कोलमडून पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे मुंबईकरांसाठी नव नवे पर्याय मुंबईत निर्माण होत असताना दुसरीकडे मात्र बेस्टची खरी लाईफ लाईन असलेल्या बेस्टला घरघर लागणे हे खऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत वेदनादायी असे आहे. या अगोदर बेस्टच्या कंत्राटदारांनी बस सेवा थांबवली असली तरी एवढा फरक पडत नव्हता कारण त्यावेळेस बेस्टचा स्वमालकीचा ताफा चांगल्या प्रमाणात होता. मात्र आता बेस्टचा मालकीचा ताफा १००० बस एवढा झाला आहे. त्यामुळे सध्या बंद पडलेल्या कंत्राटदाराच्या बसला कोणताही पर्याय नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. हंसा सिटी ग्रुपने साधारण आठ वर्षांपूर्वी २८० मिनी बस गाड्या देऊन आपली सेवा सुरू केली होती. या मिनी बसगाड्या मरोळ, ओशिवरा, दिंडोशी या तीन आगारांकडे होत्या. त्यामुळे अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या स्थानकातून विनावाहक बस सेवा सुरू करणे बेस्टला शक्य झाले होते.

पूर्वी या बस गाड्या वातानुकूलित होत्या मात्र दुरुस्ती अभावी सर्व बस गाड्यांच्या वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्या होत्या. तसेच बस गाड्यांची अवस्था ही आता बिकट झाली होती तसेच कंत्राटदाराला आता अतिरिक्त खर्च करणे न परवडत असल्याने तसेच कंत्राटामधील मूळ रक्कम ब प्रती किलोमीटर झालेला खर्च हे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे त्यांनी वेळीच आपली बस सेवा कोणतीही अटी शर्तीची पूर्तता न करता थांबवली. आधीच बेस्टची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ती आता बंद पडते की काय अशी अवस्था येऊन पोहोचली आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे होणारी पूर्तता महापालिकेकडून मिळेल अशी आशा ठेवून असणाऱ्या बेस्टला आता मुंबई महापालिकेने नकारघंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे वारंवार करवंटी घेऊन पालिकेच्या दारात बेस्टला अक्षरशः भिकाऱ्यासारखे उभे राहावे लागत आहे.

मुंबई महापालिकेकडून बेस्ट उक्रमाला आजवरची संपूर्ण तुट भरून काढण्यासाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात आलेली नाही. मागील काही वर्षांत तोट्याबाबत असे दिसते की, बेस्ट उपक्रमला हा संचित तोटा १२ हजार ९९.५५ कोटी झाला आहे हा तोटा मुंबई महापालिकेने देणे अनिवार्य आहे, मात्र मुंबई महापालिकेने आता हात वर केले आहेत. ११ जून १९१९ मुंबई महानगरपालिका यांच्या पूर्वसंमतीने बेस्ट उपक्रमाच्या वतीने महाव्यवस्थापक पेस्ट उपक्रम प्रोपेस्ट वर्कर्स यांनी केलेल्या सामाजिक सकारात बेस्ट उपक्रमात खासगी बस गाड्यांना परवानगी देण्यात आली होती. त्याचबरोबर उपक्रमाच्या सोमवारचा बसताफा तीन-तीन, सात एवढ्या राखण्यात येईल व त्याकरीता आवश्यक मनुष्यबळ नोकर भरती बेस्ट परफॉर्म मात केली जाईल असे धोरण निश्चित करण्यात आले होते.
मात्र मुंबई महापालिकेने याबाबत कोणतीच कार्यवाही केलेली नाही त्यामुळे बेस्ट प्रकरणाच्या बसचा पुढील दोन वर्षांचा उपक्रम संपूर्णपणे बंद होईल व परिस्थिती बिकट होणार आहे. बेस्ट उपक्रमात खाजगी कंत्राटदारांच्या बस वाहतुकीस परवानगी मिळाल्यानंतर खासगी ठेकेदार कंपनीकडून बस सेवा सुरू करण्यात आले. सध्या परिस्थितीत बेस्ट उपक्रमाच्या ताब्यामध्ये स्वमालकीच्या १०४७ बस असून दीड हजारांहून जास्त बस या खासगी कंत्राटदाराच्या आहेत. आतापर्यंत तीन कंत्राटदार अचानक बाहेर पडले असून त्यांच्या बस गाड्यांची संख्या ही ८०० आहे. त्यामुळे अचानक रस्त्यावरून ८०० बस गाड्या गेल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.

नवीन कंत्राटदारांच्या बसेस येत नाहीत. स्व-मालकीच्या बस गाड्या भंगारत जात आहेत त्यामुळे त्या कंत्राटदारांच्या व मालकीच्या बस गाड्यांवर प्रचंड ताण पडत आहे. कंत्राटदार सोडून गेलेल्या बस या विविध घरात धुळ खात पडून आहेत. या कंपन्यांमध्ये काम करणारे शेकडो तरुण मराठी कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर बेरोजगारीचे संकट कोलमडलेले आहे. खासगी का कंत्राटी कंपन्यांकडून बसेस देखभाल योग्य प्रकारे होत नसल्यामुळे कंत्राटी बस सेवेत असताना अचानकपणे आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा जीव हा सुरक्षित नाही. ही बाब बेस्ट उपक्रमाच्या नावलौकिकास बाधा आणणारी आहे. अशा प्रकारे बससारख्या सार्वजनिक उपक्रमामध्ये खासगी कंत्राटी बस व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेल्या अवस्थेत आल्या आहे. मात्र सध्या निवडणुकीचे दिवस असल्यामुळे याकडे लक्ष द्यायला कोणालाच वेळ नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -