वीज पडून १० शेळ्यांसह २ मेंढ्याचा मृत्यू, ४ मेंढ्या जखमी

नेवासा (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाडावर वीज पडून १२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरच्या वीज पडून झालेल्या दुर्घटनेत संतोष खरात,रामकिसन खोसे, सचिन खोसे, अक्षय पंडित, बाबासाहेब पंडित, अजित पंडित या मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


सदरच्या झालेल्या दुर्घटनेने रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रांजणगावदेवी येथील सहा कुटंबातील सदस्य सामाजिक वनीकरणाच्या परिसरात सुमारे २०० शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज पडून १० शेळ्या आणि २ मेंढ्या मृत झाल्या असून ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.


घटनेची माहिती कळताच रांजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नेवासा पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृत शेळ्या मेंढ्यांचे शिवविच्छेदन केले. तर घटनेची माहिती मिळतात धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांशी घडलेल्या दुर्घटने विषयी चर्चा करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Comments
Add Comment

आशिष शेलार यांनी केली ‘पीएम व्हिजन टू आर्ट’ स्पर्धेच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी संपूर्ण भारत देशात ‘पीएम व्हिजन टू

Shivneri ST Bus : एसटीच्या ‘शिवनेरी’ ची झेप आता मुंबई–पुण्याच्या पलीकडे!

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई – पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या

Israel - Iran War : दुबईत अडकलेले २३ कोल्हापूरकर सुरक्षित मायदेशी परतले; यूएईकडून मिळालं ‘सॉरी गिफ्ट’

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईत पर्यटनासाठी

Maharashtra Government Veterinary Health System : राज्यात पशुवैद्यकीय सेवा कोलमडणार? ६,५०० कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा, ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात!

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील शासकीय पशुवैद्यकीय सेवा आता एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.

Todays Gold-Silver Price : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उलथापालथ; ग्राहकांमध्ये संभ्रम, जाणून घ्या आजचे (४ मार्च) ताजे दर!

गेल्या काही दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने मोठे चढ-उतार पाहायला

Heat alert : हवामानाचा लपंडाव : अयोध्येत हुडहुडी तर अकोल्यात लाहीलाही! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट, दुपारनंतर...

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीची अनिश्चितता पाहायला मिळत आहे. अवघ्या आठवड्याभरापूर्वी ज्या राज्यात