Tuesday, December 10, 2024
Homeसाप्ताहिककोलाजबाईकच्या मागे धावला श्वान...

बाईकच्या मागे धावला श्वान…

क्राइम अ‍ॅड. – रिया करंजकर

श्वान हा माणसाचा प्रामाणिक मित्र आहे असे बोलले जाते आणि तेही सत्यच आहे. आपल्या घरातील माणसे किंवा मित्रपरिवार एक वेळ साथ देणार नाहीत पण श्वान मात्र आपल्याला शेवटपर्यंत साथ देतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला समाज माध्यमांतून दिसतात. हे श्वान आपल्या मालकासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाहीत. पण एखाद्याने त्यांची विनाकारण कळ काढली किंवा त्रास दिला तर त्याला मात्र सोडत नाहीत.

शहरांमध्ये रस्त्यावरील श्वानांचे प्रमाण वाढत चालले आहे. यांना सामाजिक संस्था किंवा एखादी समाजसेविका त्यांच्या जेवणाची व्यवस्था करते. नाहीतर हे श्वान दिवसभर भटकत असतात. या श्वानांचा आपापला एरिया ठरलेला असतो. तिथे बाहेरचा कुठलाही श्वान येणार नाही आणि इथला कुठे बाहेर जाणार नाही अशी त्यांची कार्यपद्धती असते. एवढेच काय तर आपल्या कंपाऊंडमधल्या गाड्याही हे श्वान ओळखतात. बाहेरची गाडी कोणती ही त्यांच्या लक्षात येते.आपल्याला श्वान गाड्यांच्या मागे पळताना दिसतात. त्यावेळी ती गाडी त्यांच्या ओळखीची नसते आणि ती गाडी त्या परिसरात आलेली असते. म्हणून श्वान गाड्यांच्या मागे धावतात. गाडीच्या मागे जेव्हा श्वान धावतात तेव्हा गाडी चालक जोरात गाडी पळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावेळी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

श्याम हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. लग्नानंतर खूप वर्षांनी त्याचा जन्म झाला होता. त्याच्यामुळे तो घरात सर्वांचा लाडका होता. त्याचे आई-वडील त्याच्या सर्वच इच्छा पूर्ण करत होते आणि या इच्छेतूनच त्याला एक महागडी बाईक खरेदी करून दिलेली होती. पण एक दिवस असा आला की, त्याच्या आयुष्यातला तो दुर्घटनेचा दिवस ठरला. त्यांनी आपली गाडी एका एरियामध्ये नेली. त्या एरियामध्ये शकुंतला ही घरकाम करत होती. अनेक घरांची कामे करून ती आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्याच्यामुळे तिला तो रस्ता ओळखीचाच होता. तो रस्ता आपला कधी घात करेल असे तिला वाटले नव्हते. श्याम नेहमीप्रमाणे आपले काम आवरून आपली गाडी घेऊन त्या रस्त्याने जात असतानाच त्याच्या गाडीच्या मागे एक श्वान लागला. त्याच्यामुळे श्याम घाबरला त्याला वाटले आपल्यावर हल्ला होतो की काय. म्हणून त्याने आपली गाडी स्पीडमध्ये केली आणि ती गाडी दुसऱ्या बाजूने वळवली. त्याचवेळी शकुंतला रस्त्याने चालत असतानाच ज्यावेळी शामने गाडी वळवली त्याचवेळी त्याच्यासमोर ती रस्ता क्रॉस करताना आडवी आली. श्याम घाबरलेला होता त्याच्यामुळे त्याची गाडी स्पीडमध्ये होती आणि अचानक समोर आली. त्याच्यामुळे त्यालाही ती दिसली नाही आणि श्यामची गाडी स्पीडमध्ये असल्यामुळे शकुंतलाला त्या गाडीने उडवले. बघणाऱ्याचे असे म्हणणे होते की, श्यामची काही चूक नव्हती. तो गाडी चालवत होता. स्पीडमध्ये होती कारण श्वान मागे लागला होता. पण शकुंतलाने अचानक रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ती दुर्घटना झाली. कारण जिथे शकुंतलाने क्रॉस केला होता ते झेब्रा क्रॉसिंग नव्हतंच किंवा तिथे सिग्नलही नव्हता. ही दुर्घटना झाल्यानंतर श्यामनेच तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. तिच्या मुलाला सांगितले की, हीचा जो काय खर्च असेल तो मी करेन. त्यामुळे त्याप्रमाणे तिच्या सर्व ऑपरेशनचा खर्च केला. तोपर्यंत शकुंतलाच्या कुटुंबाने श्यामच्या विरुद्ध तक्रार नोंदवली नाही. कारण तो खर्च करत होता. पण डॉक्टरांनी अगोदरच सांगितले होते की, शकुंतलाला वाचण्याची शक्यता कमी आहे. शकुंतलेचे ऑपरेशन झाल्यानंतर दोनच दिवसांनी दगावली. शकुंतलाचा मुलगा श्यामकडे या अपघाताबद्दल २५ लाख रुपये मागू लागला. माझी आई कमवती होती आणि महिन्याला ५० हजार रुपये कमवत होती. त्याच्यामुळे आम्हाला नुकसानभरपाई २५ लाख पाहिजे. अगोदरच श्यामचे १५ लाख तिच्या ऑपरेशनसाठी गेले होते आणि शकुंतलाचा मुलगा आता पंचवीस लाख मागू लागला होता. शकुंतला दगावल्यानंतर शकुंतलाच्या मुलाने आणि सुनेने श्यामविरुद्ध पोलीस तक्रार केली. त्याच्यामुळे पोलिसांनी श्यामला ताब्यात घेतले होते. श्यामचे काही चुकले नव्हते. श्यामच्या गाडीच्या आडवी शकुंतलाच आली होती, त्यासाठी सीसीटीव्हीचे कॅमेरे तुम्ही पाहा तुम्हाला त्याच्यात चूक कोणाची ते कळेल. शकुंतलाचा मुलगा अडूनच बसला होता की, मला माझ्या आईच्या बदल्यात पैसे हवेत. बघणाऱ्या नागरिकांपैकी असे मत होते की, मृत शकुंतलावरच केस दाखल करा. कारण तिने अचानकपणे रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न केला होता. गाड्या येतात, जातात की नाही तिने बघितले नव्हते. यामुळे तिथले रहिवासी आणि शकुंतलाचा मुलगा यांच्यात वाद सुरू झाले होते. आपल्या आईची चुकी असतानाही शकुंतलाचा मुलगा श्यामकडे २५ लाख मागत होता म्हणून नागरिकांनी पोलिसांना सीसीटीव्ही चेक करण्याचा आवाहन केले.

एक श्वान मागे लागला म्हणून, स्वतःला वाचवण्यासाठी श्यामने गाडीचा स्पीड वाढवून गाडी साईटला घेऊन चालवत होता आणि मध्येच शकुंतलाने येऊन हा अपघात झाल्याचा प्रकार सांगितला. माणुसकीच्या नात्याने श्यामने आतापर्यंत शकुंतलाच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलचा खर्च उचलत १५ लाख खर्च केले होते आणि आता शकुंतलाचा मुलगा २५ लाख मागत होता. म्हणजे एका श्वानाला चुकवताना त्याचा भुर्दंड म्हणून ४० लाख श्यामला भुर्दंड बसणार होता. श्यामची चूक नसतानाही १५ लाखांचा फटका त्याला बसलेला होता. आता तो पोलीस कस्टडीतही होता. चूक कोणाची आणि शिक्षा कोणाला.

(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -