आमच्या मुळेबाई : कविता आणि काव्यकोडी

आमच्या मुळेबाई मला
आवडतात खूप
नेहमीच असतात त्या
सदा हसतमुख

स्वभाव त्यांचा
आहे फारच गोड
मायेला त्यांच्या
नाही कसली तोड

मराठी शिकवण्यात
त्यांचा हातखंडा
नसतो कधी हातात
छडीचा दांडा

पुस्तकातल्या कविता
गातात किती छान
कथाकथन ऐकून त्यांचे
हरपून जाते भान

अडचणी सोडविण्यात
नेहमी असतात तत्पर
प्रत्येक प्रश्नाला असते
त्यांच्याकडे उत्तर

नाही कधी बडबडत
नाही बोलत रागावून
चुकले तर आईसारखे
सांगतात त्या समजावून

म्हणूनच आम्हाला प्रिय
आमच्या मुळेबाई
त्यांच्यामुळेच शाळेची
आठवण सदा येई

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड


१) अन्न खातो
पाणी पितो
खेळ खेळतो
गाणी गातो

वाक्याचा अर्थ
जो पूर्ण करतो
क्रियावाचक शब्दाला
काय बरं म्हणतो?

२) कंटाळवाण्या भाषणाला
म्हणे ‘एरंडाचे गुऱ्हाळ’
रागीट माणसाला
म्हणे ‘आग्या वेताळ’

‘कुबेर’ म्हणतात
सारेच श्रीमंताला
कुणामुळे सौंदर्य लाभे
मराठमोळ्या भाषेला?

३) दासबोध, मनाचे श्लोकांची
निर्मिती केली
सद्वर्तनाची शिकवण
समाजाला दिली

बालोपासना करण्याचा
मार्ग सांगितला
‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’
संदेश कोणी दिला?
Comments
Add Comment

आपसात भांडू नका

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. एकमेकांशी जुळवून राहणे, परस्परांना

छोटीशी गोष्ट

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ दोन-तीन महिन्यांपूर्वी नाशिकच्या हेमंत आणि नेहा सावंत नावाच्या एका तरुण

पाण्यावर लहरी कशा निघतात?

कथा : प्रा. देवबा पाटील बरं का मुला-मुलींनो! जगदेवरावांना दोन मुली होत्या. सीता आणि नीता. ह्या दोघी जुळ्या बहिणी

अजय आणि विजय

कथा : रमेश तांबे एक होता अजय अन् दुसरा होता विजय दोघे होते फारच उनाड कुणावरही पडायची त्यांची धाड दिसला कुणी कर

खरे धाडस

कथा : रमेश तांबे पावसाळ्याचे दिवस होते. भरपूर पाऊस पडत होता. ओढे-नाले-नद्या दुथडी भरून वाहत होत्या. सारे जंगल

बोलल्याप्रमाणे वागावे

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर “माणसाला त्याच्या बोलण्यावरून नव्हे तर कृतीवरून ओळखले जाते” असे आपण