आम्ही आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवलं’

सोलापूर (प्रतिनिधी): मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टीने त्याग केला ही एक बाजू असली तरी आम्ही आमच्या आमदारकी, मंत्रीपद धोक्यात घालून सत्तांतर घडवून आणले म्हणूनच भाजपा आज सत्तेत असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या त्याग केल्याच्या वक्तव्याला आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.


“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करण्यासाठीच आम्ही गुवाहाटीला जाण्याचा निर्णय घेतला होता”, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी आमच्या शिवसैनिकांची भावना आहे. मात्र महाविकास आघाडीत विरोधी पक्षनेता होण्यावरून मतभेद निर्माण होणार आणि फूट पडणार”, असे सांगत, राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी सर्वजण राजकारणात प्रयत्न करत असतात. मात्र सांगोल्यातील टेंभू म्हैसाळ या पाण्याच्या योजनांना निधी मीच आणल्याचा दावा आमदार शहाजी भाऊ पाटील यांनी केला. सांगोल्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंखे आणि माझ्यात चर्चा सुरू आहे. लवकरच दीपक आबा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतील अशी मला आशा असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी निमित्त आठवणींना उजाळा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय प्रवाहाला ठोस आकार देणारे नेते म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत

उबाठाच्या गटनेतेपदी किशोरी पेडणेकर यांची निवड

श्रद्धा जाधव यांची क्षमता, तरी दाखवला अविश्वास मुंबई : मुंबई महापालिकेत उबाठाच्या नेतेपदी माजी महापौर किशोरी

शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुनावणी लांबणीवर

‘तारीख पे तारीख’ सुरूच नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर