Wednesday, December 4, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : दाऊद गँगचे सर्व गुण घेतल्यामुळे उबाठाची 'डी' गँग झाली...

Nitesh Rane : दाऊद गँगचे सर्व गुण घेतल्यामुळे उबाठाची ‘डी’ गँग झाली आहे!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतवर घणाघात

मुंबई : केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राजाराम राऊत (Sanjay Raut) दररोज कोणतेही विधान मांडतो. आज संजय राऊतने ‘भाजपा पक्ष हा बिश्नोई गँग आहे’, या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतला चांगलेच फटकारले आहे. हिंदूचा द्वेश करणं, त्यांना टार्गेट करणं, पाकिस्तानचे झेंडे फडकवणं, पाकिस्तान झिंदाबाद म्हणणं या सर्व दाऊद गँगचे गुण उबाठाने घेतलेले आहेत. म्हणून शिवसेना उबाठा ही ‘डी’ कंपनी आहे, असं आम्ही म्हणायचं का? त्यामुळे दुसऱ्यांना कोणत्याही गँगची उपमा देण्यापेक्षा उबाठाची डी कंपनी झालेली आहे त्यावर लक्ष द्यावे. नंतर भाजपाला नावं ठेवत बसावे, असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतला लगावला. त्याचबरोबर संजय राऊतचा मालक म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावरही निशाणा साधला.

काल पुन्हा शरद पवार यांनी उद्धव ठाकरेच्या ईश्वरपूरमध्ये राहून कानाखाली मारली. एकीकडे उद्धव ठाकरे दिवसरात्र मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतो, त्यासाठी कपडे देखील शिवत आहे. तर दुसऱ्याबाजूने शरद पवार, नाना पटोले हे यांचे रोज कपडे फाडण्याचे काम करत आहेत. म्हणून उद्धव ठाकरेची लायकी काय आहे, हे आम्ही सांगण्यापेक्षा मविआचे मित्रमंडळ पक्ष दाखवत आहे, अशी बोचरी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -