भाजपाच्या जाहीरनाम्यात रयतेच्या सूचनांचा विचार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन


मुंबई (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्द असून त्यासाठी राज्यभरातील सर्वसामान्य जनतेच्या सूचनांचा स्वीकार करत येत्या काही दिवसातच पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित होणार असल्याची माहिती वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मनगुंटीवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना दिली. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या जाहीरनाम्यासाठी सहकार, बाल कल्याण, ज्येष्ठ नागरिक कल्याण, सामाजिक न्याय यासह १८ महत्वाच्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाशासित राज्यांतील उत्तम तरतुदीही समाविष्ट केल्या जातील. जाहीरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते आहे हे पाहण्यासाठी विभागनिहाय समित्या नेमण्यात येतील. अँल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे सारे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टिनेही व्यवस्था केली जाईल, अशी माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.


मुनगंटीवार म्हणाले की, भाजपा सरकारच्या काळात संपूर्ण शक्तिनिशी काम करण्यात आले. त्यामुळे भाजपा सरकारच्या कार्यकाळात दरडोई उत्पन्नात वाढ झाली. गेल्या ५४ वर्षांत जे झाले नाही ते आमच्या साडेसात वर्षांच्या कालावधीत झाले. भाजपाचा जाहीरनामा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नसून कायमस्वरुपी त्यात वाढ होत राहील. नागरीकांना संवादातून समाधान आणि प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देणार

मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असून यासाठी पंतप्रधान

'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस ‘मातोश्री’त का ठेवला ?' नार्को टेस्ट कराच!

बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावरुन नवा वाद, रामदास कदमांनी दिली धक्कादायक माहिती मुंबई : गोरेगावच्या नेस्को

ठाकरे बंधूंच्या 'युती'आधीच राजकीय 'बॉम्ब'! 'युती'चा सस्पेन्स कायम!

महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने धुरळा नव्हे तर चक्क चिखलफेक पहायला मिळाली. सर्वांचं

'उद्धव ठाकरेंनी माझे हजार रुपये वाचवले' फडणवीसांची मार्मिक टिप्पणी

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कात केलेल्या भाषणावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

'व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा आणि फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही,' एकनाथ शिंदेंचा पलटवार मुंबई: दसऱ्याच्या

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड: