Ye re ye re Paisa 3 : "ये रे ये रे पैसा ३" नव्या वर्षाची सुरुवात गाजवणार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत 'ये रे ये रे पैसा' (Ye re ye re Paisa) मल्टिस्टार चित्रपट आहे. बॉक्स ऑफिस गाजवलेल्या या चित्रपटाचा सीक्वेल 'ये रे ये रे पैसा ३' बहुचर्चित आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून नव्या वर्षात ३ जानेवारी २०२५ रोजी 'ये रे ये रे पैसा ३' चित्रपटगृहांमध्ये दाखल होणार आहे.

अमेय विनोद खोपकर एलएलपी, उदाहरणार्थ निर्मित आणि न्युक्लिअर अ‍ॅरो या निर्मिती संस्थांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर, ओमप्रकाश भट्ट, नासीर शरीफ हे या चित्रपटचे निर्माते आहेत. तर, निनाद नंदकुमार बत्तीन वरदविझार्ड एंटरटेन्मेंट हे सहनिर्माते आहेत. संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाची पटकथा सुजय जाधव यांची आहे.

तर, संवाद लेखन अरविंद जगताप यांनी केलं आहे. पंकज पडघन आणि अमितराज यांचे दमदार संगीत या चित्रपटाला लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजात एक गाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, विशाखा सुभेदार, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटातून भेटीस येणार आहे.

संजय जाधव यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट म्हणजे नक्कीच वेगळं, काहीतही हटके पाहण्याची पर्वणी असते. त्यांच्या प्रत्येक चित्रपटानं तो अनुभव दिला आहे. 'ये रे ये रे पैसा' आणि 'ये रे ये रे पैसा २' या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आहे. पैसा मिळवण्यासाठीच्या प्रयत्नात भलत्याच गोष्टी घडतात आणि त्यातून होणारी धमाल आता आणखी वेगळी, मनोरंजक होणार आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकार हा तगडा अभिनेता आहे. त्यामुळे मनोरंजनासह सर्वांच्याच कसदार अभिनयाची जुगलबंदीही पाहता येणार आहे. त्यामुळे नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धमाल उडवण्यासाठी 'ये रे ये रे पैसा ३' सज्ज होत आहे.

Comments
Add Comment

'बिग बॉस मराठी ५'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात

मुंबई : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतीच कोकण हार्टेड गर्ल

“जॉली एलएलबी ३” ची बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई; अर्शद वारसी आणि हुमा कुरेशीसाठी ठरतोय गेमचेंजर

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘जॉली एलएलबी ३’ हा चित्रपट प्रेक्षकांकडून भरभरून

रिया चक्रवर्तीला दिलासा: मुंबई उच्च न्यायालयाने पासपोर्ट परत करण्याचे दिले आदेश!

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ला अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा पासपोर्ट

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : मॅनेजरनेच दिले विष, समोर आली धक्कादायक माहिती

सिंगापूर : सुप्रसिद्ध गायक झुबीन गर्ग याचा १९ सप्टेंबरला सिंगापूर येथे नॉर्थ इस्ट इंडिया फेस्टिवल दरम्यान बुडून

ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन; वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास!

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता व्ही. शांताराम यांच्या पत्नी, ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री संध्या

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक