मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक

  104

मुंबई : राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. अज्ञात हॅकर्सने आदिती तटकरे यांचे फेसबुक अकाउंट हॅक केले आहे. तसेच त्या हॅकर्सने या अकाउंटवरून काही आक्षेपार्ह पोस्टही केल्या आहेत.


आदिती तटकरे यांनी ट्विट करून या सगळ्यांची माहिती दिली आहे.


आदिती तटकरे यांनी याबाबत 'नमस्कार, माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती. याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व", असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


आदिती तटकरे यांनी संबंधित प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. आता पोलिसांना हॅकर्सचा शोध घेण्यात यश येतं का? तसेच पोलीस संबंधित आरोपींवर काय कारवाई करतात? ते पाहणं देखील महत्त्वाचे असणार आहे.

Comments
Add Comment

पुण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला राडा

पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या

अरे बापरे! पुण्यात हे चाललंय तरी काय? घरात घुसून डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर बलात्कार!

पुणे: पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये

आषाढी वारीच्या पार्श्वभुमीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई: १४ लाख ५० हजारांहून अधिक मुद्देमाल जप्त!

सोलापूर: पंढरपूरची आषाढी वारी काही दिवसांवर आली असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर जिल्ह्यात अवैध

तृतीय पंथीयांनाही एसटीत ५० टक्के सवलत

मुंबई : महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीय पंथीयांनाही एसटीच्या प्रवासात

साई मंदिरात करोडोंच्या श्रद्धेवर दरोडा !

शिर्डी :  जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेल्या शिर्डीच्या साई मंदिरात चोरट्यांचा

साईबाबांच्या तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला ९ जुलै पासून प्रारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था ( शिर्डी )च्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी बुधवार दि.०९ जुलै