Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदवार्ता! 'या' तारखेपासून पुन्हा रुळावर धावणार माथेरानची मिनीट्रेन

मुंबई : मुंबईकरांसाठी सर्वात जवळचे हिल स्टेशन (Hill Station) म्हणजे माथेरान (Matheran). या माथेरानचे निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांसाठी 'माथेरानची राणी' म्हणजेच मिनीट्रेन (Matheran Mini Train) उपलब्ध करु देण्यात आली आहे. नेरळ ते माथेरान अशा २१ किलोमीटरच्या प्रवासात डोंगर दऱ्या पाहत प्रवास करताना पर्यटकांना मोठा आनंद मिळतो. पावसाळ्याच्या कालावधीत घाटरस्ता आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे चार महिने ही मिनीट्रेन सेवा बंद ठेवण्यात येते. परंतु परतीच्या पावसानंतर दरवर्षी १५ ऑक्टोबरपासून मिनीट्रेनची सेवा प्रवाशांसाठी पुन्हा सुरु केली जाते. मात्र यंदा ही तारीख उलटून गेली तरीही मिनीट्रेन सुरु न केल्यामुळे पर्यटक नाराजीचा सूर मारत असताना आता लवकरच ही माथेरानची राणी पर्यटकांच्या सेवेसाठी सज्ज होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १ नोव्हेंबरपासून माथेरानची राणी पुन्हा धावण्यास सज्ज होणार आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे यंदा ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला असून सध्या परतीचा पाऊसही ओसरला आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच ही सेवा सुरु होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.


दरम्यान, पर्यटकांचा प्रतिसाद पाहता या मार्गावर फेऱ्या वाढवल्यास पर्यटनात आणखी वाढ होऊ शकते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Shet Panand Raste Yojana : शेतकऱ्यांनो नियम पाळा, नाहीतर...आधार ब्लॉक होणार, ५ वर्षे सरकारी योजना बंद; शेतरस्ता योजनेची नवीन नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने 'मुख्यमंत्री

धक्कादायक! हॉस्पिटलच्या टीमनेच केला नवजात बाळाचा ३ महिन्यापेक्षा अधिक सांभाळ

सांगली : सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हॉस्पिटलमध्ये २६ नोव्हेंबर २०२५

Dr. Jaysingrao Pawar : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

- मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली मुंबई : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव

जालन्यात इंधन वितरणावर निर्बंध; पोलीस बंदोबस्तात पेट्रोल-डिझेल वाटप

जालना: जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील

रामनवमीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते बंद राहतील

पुणे: देशभरात आज रामनवमीचा सण मोठ्या उत्सहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जात आहे. प्रभू श्रीरामचंद्र

Ashok Kharat: व्हायरल व्हिडीओने खळबळ, अशोक खरात एचआयव्ही पॉझिटिव्ह?

मुंबई: महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवे धक्कादायक