जागावाटपावरून मविआत धुसफूस; समाजवादी पार्टीचा राज्यातील १२ जागांवर डोळा

  55

मुंबई : विधानसभेची आचारसंहिता जाहीर झाली, त्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपांच्या बैठक होत आहे. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केलं. आम्ही महाराष्ट्रात इंडिया आघाडीने एकत्र निवडणुका लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. आम्हाला जास्त जागा मिळण्याची अपेक्षा आहे, असं विधान त्यांनी केलं.


सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी गुरूवारी लखनौमध्ये पत्रकारांशी बोलताना इंडिया आघाडी जोरदारपणे काम करत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विचारले असता ते म्हणाले, मी उद्या महाराष्ट्रात जाणार आहे.


विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत युती करण्याचा आमचा प्रयत्न असेल. राज्यात आमचे दोन आमदार आहेत. आम्हाला आशा आहे की, यावेळी जास्त जागा मिळतील. आम्ही पूर्ण ताकदीने इंडिया आघाडीसोबत उभे राहू.


दरम्यान, सध्या महाराष्ट्रात सपाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी अबू आझमी हे शिवाजी नगरचे तर रईस शेख हे भिवंडीचे आमदार आहेत.


यंदा सपाचा महाराष्ट्रातील १०-१२ जागांवर डोळा आहे. यामध्ये मुस्लिम आणि युपीचे लोक मोठ्या संख्येने राहतात अशा ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, महाविकास विकास आघाडीत सपाला ३-४ जागा मिळू शकतात, अशी चर्चा आहे.



अबू आझमींचा मविआला इशारा…


महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपल्या आघाडीत समाजवादी पक्षाचा अपमान करू नये. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक बैठका झाल्या. मात्र समाजवादी पक्षाला एकाच बैठकीत बोलावण्यात आले आणि केवळ १५ मिनिटे चर्चा झाली. समाजवादी पक्ष हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे, त्याला हलक्यात घेऊ नये, जर समाजवादी पार्टीला विश्वासात घेतले नाही आणि योग्य वाटा दिला नाही तर स्वबळावर लढू, असा इशारा आझमींनी दिला.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार