महाराष्ट्राच्या निवडणूक रणसंग्रामातून ‘आप’ची माघार

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार देणार नसून दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे.


इंडिया आघाडी मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत.


आम आदमी पक्षाचे लक्ष दिल्लीवर आहे, महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात आणखी संभ्रम निर्माण करायचा नाही. ज्यामुळे भाजपविरोधी मतांचे विभाजन होऊ शकते, असे आप नेत्यांना वाटते. ११ ऑक्टोबर रोजी आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयात बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला पक्षाचे राज्य ते बुथ स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.


संदीप पाठक यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी लढवणार नाही. एक किंवा दोन विधानसभेच्या जागांसाठी वाटाघाटी करणं व्यर्थ असल्याचं पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

नवजात बालकांची विक्री रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार करणार कठोर कायदा; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरातील दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये नवजात बालकांची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या

गिग वर्कर्सच्या गुन्ह्यांना बसणार लगाम; पोलीस पडताळणी आणि सेंट्रल पोर्टलवर नोंदणी आता बंधनकारक

मुंबई: राज्यातील खाद्यपदार्थ आणि विविध वस्तू घरपोच देणाऱ्या 'गिग' वर्कर्सच्या (Gig Workers) माध्यमातून घडणाऱ्या

दुसऱ्या टप्प्यात जातीनिहाय जनगणना होणार; मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला संभ्रम दूर

मुंबई: एप्रिलपासून सुरु होत असलेली जनगणना पहिल्या टप्प्यातील असून यामध्ये केवळ घरगणना होत आहे. त्यामुळे

नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: नागपूर नवीन विधानभवनचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्यात यावे. विधानसभा आणि विधान परिषदेचे सभागृह, मध्यवर्ती

पुणेकरांसाठी मनपाचा उपक्रम; 'क्यूआर' स्कॅन करा अन विकासकामे सुचवा

पुणे :  पुणे महापालिकेच्या २०२६-२७ च्या वार्षिक अर्थसंकल्पात पुणेकरांना थेट सहभाग घेता येणार आहे. शहराच्या

'ई-चलान' वसुलीसाठी सक्ती केल्यास पोलिसांवरच होणार कारवाई; पोलीस महासंचालकांचे निर्देश

मुंबई : रस्त्यावरील वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या ‘ई-चलान’च्या दंडाची वसुली करताना