Wednesday, December 4, 2024
Homeक्रीडाIND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावर पावसाचं सावट; खेळ...

IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावर पावसाचं सावट; खेळ रद्द होण्याची शक्यता!

बंगळुरू : आजपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी मालिकेचा शुभारंभ होणार आहे. मात्र हा सामना होण्यापूर्वीच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या परतीच्या पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी शाळांसह कार्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा कहर सुरू असताना याचा फटका आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही पडणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बंगळुरूमध्ये पावसाने थैमान घातले आहे. या ठिकाणी ऑर्रंज अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही हवामान विभागाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणारा पहिलाच सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हवामान विभागाने काय म्हटले?

पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असून संपूर्ण दिवस पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दुपारी २ च्या सुमारास पावसाचा जोर थांबणार असला तरीही ४ वाजेच्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल.

या सामन्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी नव्हे तर पाचही दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे. त्यामुळे हा कसोटी सामना रद्द होण्याचा अंदाज दिला जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -