Akshay Kumar : 'हिरोगिरी फू फू करने में नही...'अक्षय कुमारची ही जाहिरात होणार बंद!

सेन्सॉर बोर्डाने दिले आदेश; नेमकं कारण काय?


मुंबई : सहा वर्षांपूर्वी अक्षय कुमारची (Akshay Kumar) 'हिरोगिरी फू फू करने में नहीं..' ही जाहिरात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आली होती. सर्व टिव्ही माध्यमांसह अनेक चित्रपटगृहातही ही जाहिरात दाखवण्यात येत होती. परंतु सेन्सॉर बोर्डाने आता ही जाहिरात हटवण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ साली 'हिरोगिरी फू फू करने में नहीं.. असं म्हणत हॉस्पिटलबाहेर सिगारेट फुंकत उभारलेला नंदू आणि सायकलवरून येणाऱ्या अक्षय कुमार त्याला धुम्रपानापासून थांबवतो (Smoking is injurious) आणि महिलांच्या मासिक पाळीसाठी लागणारे सॅनिटरी पॅड हातात देतो. मासिक पाळीत घाणेरडे कपडे वापरल्यामुळे होणाऱ्या गंभीर आजारांपासून स्वत: चे संरक्षण करण्यासाठी तो महिलांना पॅड खरेदी करण्याचा सल्ला नंदूला देत असतो', अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र सध्या या जाहिरातीच्या आधारे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मिम्स व्हायरल होत असल्यामुळे सेन्सॉर बोर्डाने ही जाहिरात काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.


दरम्यान, ही जाहिरात काढून तंबाखू, धुम्रपान करणं हानीकारक असल्याचे सांगणारी एक नवी जाहिरात येणार असल्याचीमाहिती मिळत आहे.

Comments
Add Comment

अभिनेत्री नीना कुळकर्णी यांना विष्णुदास भावे पदक जाहीर

सांगली (वार्ताहर) : मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक

गरोदरपणानंतर रुबिना दिलीकचा आत्मविश्वास डगमगला!

मुंबई: पती-पत्नी और पंगा या शोमध्ये अभिनेत्री रुबिना दिलैक पती अभिनव शुक्ला सोबत मस्ती करताना दिसत आहे. या

डीपफेक व्हिडिओंचा गैरवापर: ऐश्वर्या-अभिषेकची थेट हायकोर्टात धाव, YouTube-Google कडे ४ कोटींची मागणी!

मुंबई: बॉलिवूडचे पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी यूट्यूब आणि त्याची मूळ कंपनी गुगल

दशावतार सिनेमाने अवघ्या तीन आठवड्यात केला विक्रम... २१ दिवसात किती कोटी कमावले?

दशावतार हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली छप्प्पर फाड कमाई करत आला आहे. तब्ब्ल तीन आठवडयांनी सुद्धा

महात्मा गांधींच्या पणतीचे ग्लॅमरच्या जगात वेगळे स्थान!

महात्मा गांधी यांचे नाव संपूर्ण जग आदराने आणि श्रद्धेने लक्षात ठेवते. त्यांचे विचार, तत्त्वे आणि सत्य व अहिंसेचा

नांदेडच्या कैलास यांनी केबीसी १७ मध्ये जिंकले ५० लाख रुपये

कौन बनेगा करोडपती’ हा शो छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय शो आहे. आजवर लाखो स्पर्धकांनी या शोमध्ये सहभागी होत