Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Crime News : माणुसकीला काळीमा! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून अनैसर्गिक कृत्य

Crime News : माणुसकीला काळीमा! ११ वर्षीय मुलावर ९ जणांकडून अनैसर्गिक कृत्य

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलावर ९ जणांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


दरम्यान महाराष्ट्र राज्यात बाललैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शाळेतील अल्पवयीन मुली,अथवा चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचारांच्या घटना महाराष्ट्रात घडतांना दिसून येत आहे. यातच आता आणखी एक विचित्र घटना समोर आली आहे. ११ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलावर ९ जणांनी मिळून सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकरा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करण्यात आले असून अत्याचार करणारे नराधम आरोपी देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


याबाबत पीडित मुलाच्या आईने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात सांगितले की, पीडित मुलाला धमकावून सदरचे कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा एकदा बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांची गंभीर परिस्थिती समोर आली आहे. राज्यात बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार आणखी प्रकाशझोतात येण्यास सुरुवात झाली आहे.


पुण्यात देखील शाळेच्या बस चालकाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. या नाराधमांना वयाचे भान राहिले नव्हते, आता श्रीरामपूरच्या घटनेनंतर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून अशा या घटनांवर आळा घालण्यासाठी कठोर कायदे व तातडीने कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले असल्याचे दिसत आहे.

Comments
Add Comment