मुंबई : यंदाचे हे वर्ष हॉरर कॉमेडी चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट ठरले आहे. दोन महिन्यांपूर्वी रिलीज झालेला ‘स्त्री २’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सध्या सर्वत्र ‘भूल भुलैया ३’ (bhoolbhulaiyaa 3) ची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), विद्या बालन(vidya balan), तृप्ती डिमरी आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून आज या चित्रपटातील पहिले गाणे सर्वत्र रिलीज झाले आहे.
या गाण्यात अमेरिकन रॅपर पिटबुल आणि दिलजीत दोसांझ पहिल्यांदाच एकत्र गायले आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना पंजाबी गाण्यावरती आणि आंतरराष्ट्रीय बीट्सवर एकाचवेळी थीरकता येणार आहे.
दरम्यान, या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना भुल भुलैया ३ हा चित्रपट १ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. तसेच हा चित्रपट स्त्री २ पेक्षाही वरचढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…