Badlapur Returns : आचारसंहिता जाहीर होताच मुख्यमंत्र्यांना मोठे 'टेन्शन'

  292

शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, जामीन मिळताच ठाणेकर भडकले

ठाणे : तिकडे नवी दिल्लीत आचारसंहिता जाहीर होत असतानाच इकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र खूप मोठ्या 'टेन्शन'मध्ये दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात 'बदलापूर रिटर्न्स' (Badlapur Returns) घडल्याचे मंगळवारी दिसून आले.


ठाण्यातील भंडार आळी भागात एका ११ वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीचा विनयभंग करणा-या आरोपीला जामीन दिल्यामुळे संतापलेल्या जमावाने पीडित चिमुकलीच्या माता-पित्यांसह ठाण्यातील शेकडो महिलांनी मंगळवारी ठिय्या मांडत आक्रोश केला. चिमुकलीसोबत गैरवर्तन करणारा आरोपी शिंदे गटाचा (Shinde Group) उपविभागप्रमुख असून सचिन यादव असे त्याचे नाव आहे.


अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केल्याच्या या प्रकरणात आरोपी सचिन यादव (५५) याच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र विनयभंगाच्या आरोपीला जामीन मिळालाच कसा? असा सवाल लाडक्या बहिणींनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.


आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर ठाण्यात पीडितेच्या आई-वडिलांसह शेकडो महिलांनी ठिय्या आंदोलन केले. तसेच, शिंदे गटाच्या उपविभागप्रमुखाला तत्काळ अटक करा, अशी मागणी मनसेचे पदाधिकारी आणि चिमुकलीच्या घरच्यांनी केली आहे.


ठाण्याच्या स्टेशन परिसरातील भंडार आळीत राहणारी चिमुकली शुक्रवारी दुपारी ट्युशनला जात होती. तेव्हा शिंदे गटाचा उपविभागप्रमुख सचिन यादव याने त्या मुलीला इमारतीमध्ये गाठत विनयभंग केला. त्यावेळी घाबरलेल्या पीडित तरुणीने त्या नराधमाला लांब ढककले. त्यानंतर संतापलेल्या सचिन यादवने अश्लील भाषेत भाष्य केले. पीडित मुलीने आपल्यासोबत झालेला प्रकार तात्काळ कुटुंबियांना सांगितला. या घटनेची गंभीर दाखल घेत पीडितेच्या कुटुंबियांनी थेट ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक देखील केली.


परंतु, विनयभंग करणा-या आरोपीला दुस-याच दिवशी जामीन मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नराधमाला एकाच दिवसांत जामीन मंजूर होतोच कसा? असे मनसे नेते अविनाश जाधव आणि पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आज पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीला पुन्हा अटक करण्याची मागणी केली.


एकीकडे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा एन्काऊंटर आणि या आरोपीला पोलिसांकडून वेगळा न्याय का? असा संतप्त सवाल महिलांनी विचारला आहे.


दरम्यान, पीडित चिमुरड्याच्या कुटुंबियांना धमक्यांचे सत्र सुरू झाले आहे. तक्रार मागे घ्या अन्यथा तुमचे वाईट करू, अशा धमक्या पीडितेच्या कुटुंबियांना आल्यात. त्यामुळे मनसे पदाधिका-यांनी पीडितेच्या कुटुंबियांसोबत आंदोलन करत ठिय्या दिला. जर दोन दिवसांत त्या नराधमाला अटक केली नाही तर, भंडार आळीपासून ते मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत आम्ही कॅन्डल मार्च काढू, असे यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.



पीडितेच्या कुटुंबियांच्या या आहेत चार मागण्या...



  • नराधम सचिन यादवला तत्काळ अटक करावी

  • थाथुरमाथूर कलमं लावली असल्यामुळे कलमांत वाढ करावी

  • हे प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवावे

  • जे कोणी धमक्या देत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना