मुंबई : मराठी सिनेसृष्टीसह बॉलीवूडमध्ये (Bollywood) ‘देढ फुट्या’ या भूमिकेने लोकप्रिय असणारे अभिनेते संजय नार्वेकर (Sanjay Narvekar) चाहत्यांना लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसून येणार आहेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ (Raanti) हा मराठीतला सगळ्यात मोठा अॅक्शनपट सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये संजय नार्वेकर अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत.
आपल्या भूमिकेबद्दल बोलताना संजय नार्वेकर सांगतात, ‘सदा राणे’ हा वरकरणी अतिशय शांत पण आतून कपटी असा खलनायक साकारणे माझ्यासाठी चॅलेंजिंग होते. चित्रपटाच्या कथानकाला वळण देणारी ही भूमिका प्रेक्षकांनाही धडकी भरवणारी आहे. ‘कथेच्या गरजेनुसार भूमिकेत शिरणे माझ्यासाठी नेहमीच आव्हानात्मक असते. अशा भूमिका फार कमी लिहिल्या जातात, दिग्दर्शक समित कक्कड यांच्या ‘रानटी’ चित्रपटामुळे मला ‘सदा राणे’ या खलनायकाच्या व्यक्तिरेखेत प्रवेश करण्याची जबरदस्त संधी मिळाली आणि मी माझ्या पद्धतीने ती पडद्यावर साकारली आहे. समितच्या चित्रपटात काम करणे हा नेहमीच एक भन्नाट अनुभव असतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटाची कथा जबरदस्त असल्याने त्यात भूमिका करणे हे प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं. प्रेक्षकांनाही हा ‘सदा राणे’ दीर्घकाळ लक्षात राहील याची मला खात्री वाटते.
दरम्यान, ‘रानटी’ चित्रपटासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांचं संकलन अशी भक्कम तांत्रिक बाजू असलेली टीम लाभलेली आहे. येत्या २२ नोव्हेंबर रोजी रानटी चित्रपट सर्व चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…