हरियाणात गुरुवारी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी

पंतप्रधान मोदींसह भाजपाचे ज्येष्ठ नेते राहणार उपस्थित


नवी दिल्ली : हरयाणाच्या नव्या सरकारचा शपथविधी १७ ऑक्टोबरला होणार आहे. नायब सिंह सैनी सकाळी १० वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंचकुलामध्ये हा कार्यक्रम आयोजित होणार आहे. या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित असणार आहेत. या शपथविधी सोहळ्याची माहिती केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांचा शपथविधी सोहळा १७ ऑक्टोबर रोजी पंचकुलामध्ये होणार आहे.


शपथविधी सोहळ्याला सुमारे ५० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजपशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या मोठ्या नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल विज, कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. हरयाणात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने फक्त ३७ जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत जेजेपी आणि आम आदमी पक्षाला जागा मिळालेल्या नाहीत. राज्यातील तीन जागा अपक्ष आल्या आहेत.

Comments
Add Comment

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड

आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी

दिल्लीमधील सरकारने दिले आदेश नवी दिल्ली : भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे देशातील अनेक शहरांमधील लोक त्रस्त

काश्मिर खोरं गोठलं! तापमानात विक्रमी घसरण

श्रीनगर: हिवाळ्यात अनेकजण थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जातात. गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यासाठी डिसेंबर

गुजरात एटीएसची छापेमारी! राजस्थानातून जप्त केले २२ किलो ड्रग्ज

राजस्थान: राजस्थानमधून ड्रग्ज तस्करीबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानमधील भिवाडी इथे गुजरात

नववर्षाच्या स्वागतासाठी सुरक्षा दलांचे 'कवच' तैनात!

काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' घाटीत थरकाप उडवणारी थंडी, पण सुरक्षा यंत्रणा अलर्ट जम्मू-कश्मीर : नववर्षाच्या

सेना-नौदल-वायुसेनेची ताकद वाढणार

८० हजार कोटींच्या संरक्षण खरेदीला केंद्राची मंजुरी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या