भररस्त्यात पतीने चाकूने गळा चिरून केली पत्नीची हत्या

भाईंदर : मीरा रोड येथील नया नगर भागात भररस्त्यात पतीने आपल्या पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. परंतू त्यात तिचा मृत्यू न झाल्याने त्याने गळा चिरून तिची हत्या केली. दोघात घटस्फोटाची न्यायालयात लढाई सुरू असताना मुलाचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादामुळे असे कृत्य केल्याची प्राथमिक महिती पोलिसांना मिळाली आहे.


मीरा रोडच्या नया नगर भागात नदिम खान आणि त्याची पत्नी अमरीन दोघे राहत होते. काही दिवसापासून त्यांच्यात वाद सुरू होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले होते. न्यायालयात याचिका सुरू असताना मुलाचा ताबा आईकडे देण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार मुलाची आई अमरीन नया नगर येथिल नदीम खान यांच्याकडे न्यायालयाचा आदेश घेऊन आली होती. त्यापूर्वी गुरुवारी तिने नया नगर पोलीस ठाण्यात यासाठी संरक्षण मागितले होते. त्यासाठी आवश्यक ते शुल्क भरले होते. तिला पोलिसांनी शुक्रवारी दुपारनंतर संरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार ती आली असता नया नगर भागातील मुख्य रस्त्यावर पती नदीम खान याने तिला गाठून तिच्यावर हल्ला केला. नंतर तिचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली.


रस्त्यावर गस्त घालत असलेले पोलीस व लोकांनी नदीम याला पोलिसांच्या ताब्यात दिले. तेथे त्याने मुलाचा ताबा घेण्यावरून झालेल्या वादामुळे नैराश्य येऊन हत्या केल्याची कबुली दिली आहे.


दरम्यान प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते तथा प्राध्यापक डॉ सुरेश येवले यांनी पोलिसांनी न्यायालयाचे आदेश असूनही हलगर्जीपणा दाखविल्याचा आरोप केला आहे. तर पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी पोलिसांनी अमरिनला संरक्षण दिले होते परंतु तिचा पती बाहेर गावी गेला असल्याने तिला शुक्रवारी बोलाविण्यात आले होते, असे सांगितले आहे.

Comments
Add Comment

सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा घेतला बदला, कबड्डीपटू राणा बलाचौरियाची हत्या; बंबिहा गँगने घेतली जबाबदारी

मोहाली : पंजाबमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मोहाली जिल्ह्यातील सोहाना कस्ब्यात सुरू

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

मेस्सीला न भेटता अनुष्का आणि विराट कोहली महाराजांच्या भेटीला

वृंदावन : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी नुकतीच वृंदावनमधील प्रसिद्ध

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

धक्कादायक! मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न; पैशाच्या वादातून उचलले टोकाचे पाऊल

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या समोर एका व्यक्तीने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

वकिलाकडून थुंकीने पान उलटण्यावर न्यायाधीशांचा आक्षेप

कोलकाता : कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अमृता सिन्हा यांनी एका वकिलाने थुंकी लावून पान उलटण्यावर