Ratan Tata Death : उद्योग क्षेत्रातील महर्षी महाप्रयाण!

भाजपा खासदार नारायण राणे यांच्याकडून रतन टाटांना श्रध्दांजली अर्पण


मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा (Ratan Tata Death) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिग्गज नेते, उद्योजक आणि कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रध्दाजंली वाहिली आहे. भाजपा पक्षाचे (BJP) खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रध्दांजली अर्पण केली आहे.


नारायण राणे यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, देशाच्‍या नव्‍हे तर जगाच्‍या उद्योग क्षेत्रातील ऋषितुल्‍य व्‍यकित्‍मत्व पद्मविभूषण रतन टाटा यांच्‍या निधनामुळे उद्योग क्षेत्राची व भारतातील सामाजिक जबाबदारीच्‍या मोहिमेची मोठी हानी झाली. टाटा उद्योग समुहाला जगातील प्रमुख उद्योगांच्‍या बरोबरीने आणतानाच त्‍यांनी सामाजिक जबाबदारीचे भान कायम ठेवले. देशावर आलेल्‍या संकटाच्‍या वेळी त्‍यांनी आपल्‍या उद्योगाच्‍या तिजोरीची दारे खुली ठेवली.


त्याचपुढे, नेतृत्‍व २००८ च्‍या मुंबईवरील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या वेळी दिसून आले. राखरांगोळी झालेले टाटाचे मुंबईच्‍या प्रवेशद्वारावरील ताज हॉटेल त्‍यांनी अल्‍पावधीतच पूर्वीच्‍या दिमाखात सुरु केले. एवढे मोठे आर्थिक साम्राज्‍य हाताशी असताना वैयक्तिक मानमरातबासाठी त्‍यांनी त्‍याचा उपयोग केला नाही. गोरगरीब व भटक्‍या प्राण्‍यांसाठीचा त्‍यांचा कनवाळूपणा जगजाहीर होता. महाराष्‍ट्राचा उद्योगमंत्री असताना औद्योगिक धोरणाच्‍या बैठकांमध्‍ये उद्योगांप्रती त्‍यांची तळमळ, बांधिलकी व दूरदृष्‍टी जवळून अनुभवण्‍याची संधी मला मिळाली.


या महान व्‍यक्तिमत्‍वाला मी मनापासून श्रध्‍दांजली अर्पण करतो व त्‍यांच्‍या जाण्‍याचे दु:ख सहन करण्‍यासाठी परमेश्‍वराने टाटा कुटुंबियांना बळ द्यावे अशी मनोभावे प्रार्थना करतो, असे नारायण राणे यांनी लिहले आहे.


Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व