श्रीनगर : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुक २०२४चे अंतिम निकाल समोर आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडीने १० वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत ४९ जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. एनसीचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनणार आहेत.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. नॅशनल कॉन्फरन्स ४२ जागा मिळाल्या आहेत. २९ जागा मिळवून भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
नॅशनल कॉन्फरन्ससोबत आघाडी करून निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यांना केवळ ३ जागा जिंकता आल्या. जम्मू-काश्मीर पीपल कॉन्फरन्स, सीपीआयएम आणि आप यांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे. तर ७ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.