कोळसा खाणीतील भीषण स्फोटात ६ ठार

  58

नवी दिल्ली: पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कोळसा खाणीत सोमवारी भीषण स्फोट झाला. सकाळी १०.३० वाजता भादुलिया ब्लॉकमधील कोळसा खाणीत ही घटना घडली. या स्फोटात सहाजण ठार झाले.


स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. गंगारामचक गावातील (जि.बीरभूम) खासगी कोळसा खाणीत ब्लास्टिंग सुरू असताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.


सुरुवातीला स्फोटानंतर खाण कोसळली. त्यामुळे हा अपघात अधिक धोकादायक झाला. या दुर्घटनेत अनेक मजुरांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत.


यापूर्वी बीरभूम जिल्ह्यातील नलहाटी पोलिस स्टेशन हद्दीतील महेश गुडिया गावात दगड फोडताना दगडाच्या खाणीत अडकून जागीच काम करणाऱ्या तीन मजुरांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Cloudburst Updates : एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर, भूस्खलन अन् ३० जण... हिमाचल प्रदेशात हाहाकार

हिमाचल प्रदेश : हिमाचल प्रदेशात नैसर्गिक संकटाने तेथील जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक रस्ते भूस्खलनाने बंद

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे