Big Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीचं आज ग्रँड फिनाले! कोण कोरणार ट्रॉफीवर स्वत:च नाव

पाहा व्होटिंग ट्रेंड्स काय म्हणतात?


मुंबई : मागील ७० दिवसांपासून कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवर सुरु असणारा बिग बॉस मराठी सीजन ५ (Big Boss Marathi 5) या शो'चा आज ग्रँड फिनाले (Grand Finale) पार पडणार आहे. आज बिग बॉसच्या घरातील १४ आठवड्यांचा प्रवास संपणार असून विजेता मिळणार आहे. सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, धनंजय पोवार हे सहा सदस्य ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले असून यापैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.



व्होटिंग ट्रेंड्स काय सांगतात?


व्होटिंग ट्रेंड्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा लाडका 'गुलिगत किंग' सूरज चव्हाण आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या क्रमांकावर अंकिता वालावरकर, तिसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंत, धनंजय पोवार चौथ्या क्रमांकावर तर निक्की तांबोळी पाचव्या क्रमांकावर असणार आहे. तसेच जान्हवी किल्लेकर याबाबतीत पिछाडीवर असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, बिग बॉस मराठीचा यंदाचा सीजन इतर सीजन पेक्षा प्रचंड गाजला. निक्की तांबोळीचं बाईईई... काय प्रकार, सूरज चव्हाणची झापुक-झुपुक स्टेप, अभिजीतचं गाणं यामुळे यंदाचा सीझन पहिल्या दिवसापासून चर्चेत होता. परंतु आता काही तासांत हा सीझन प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Comments
Add Comment

AI मुळे दीड वर्षातच बंद होतील मराठी आणि हिंदी चित्रपट ; दिग्दर्शक महेश मांजरेकरांचं भाकीत

 मुंबई : AI (आर्टिफिशिअल इंटिलिजन्स ) चा वापर आपण आजकाल सर्रास सर्वच गोष्टींमध्ये करतो. AI हे हळू हळू लोकांची कामं

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा

साठाव्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसाठी किंग खानची खास 'भेट'; गाजलेले चित्रपट पुन्हा होणार प्रदर्शित

मुंबई: बॉलिवूडचा 'किंग खान' शाहरुख खान १९९१ मध्ये दिल्लीहून मुंबईत आला आणि त्यानंतर तो थेट करोडो प्रेक्षकांच्या

सुप्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन

किडनीच्या आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास मुंबई: बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध

'क्योंकि सास भी कभी बहू थी' २ मध्ये झळकणार बिल गेट्स

मुंबई : २००० ते २००८ च्या कालावधीत घराघरात पोहोचलेली हिंदी मालिका म्हणजेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही मालिका आता

सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार?

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्युप्रकरणाला आता तब्बल चार वर्षांहून अधिक काळ उलटला असला तरी या