Pune News : हवाई प्रवाशांसाठी आनंदवार्ता! इंडिगोने सुरू केले पुणे-भोपाळ उड्डाण

इतर मार्गांवरही वाढवणार उड्डाणांची संख्या


पुणे : इंडिगो या भारतातील पसंतीच्या एअरलाइनने (Indigo Airlines) पुणे आणि भोपाळ यांना जोडणारा नवीन मार्ग सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. या नवीन मार्गामुळे पर्यटना बरोबरच या दोन शहरांमधील महत्त्वाच्या व्यापार व्यवसायाला देखील प्रोत्साहन मिळेल. २७ ऑक्टोबर २०२४ पासून दररोज या मार्गावर उड्डाण सुरू होईल. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल आणि या भागात राहणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.


ग्लोबल सेल्स, इंडिगोचे प्रमुख श्री. विनय मल्होत्रा म्हणाले, “२७ ऑक्टोबरपासून भोपाळ आणि पुणे या शहरांमध्ये दररोज थेट उड्डाणे सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ही नवीन उड्डाणे सोयीस्कर समयी असतील आणि ती दोन प्रांतांना जोडण्याचे महत्त्वाचे काम करतील. भारतातील आघाडीची विमान सेवा म्हणून आम्ही व्यवसाय तसेच पर्यटनासाठी नवनवीन मार्गांवर उड्डाणे सुरू करून विशेषतः सणासुदीच्या मोसमातील वाढत्या मागण्या पूर्ण करण्याचे वचन पाळण्याबाबत कटिबद्ध आहोत. आमच्या व्यापक ६ ई नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही भारतात आणि भारताच्या बाहेर सुरक्षित, किफायतशिर आणि वेळ पाळणारी सेवा व त्रासमुक्त प्रवास ऑफर करण्याची परंपरा चालू ठेवली आहे.”


तसेच ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ किंवा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे महाराष्ट्रातील एक गजबजलेले शहर आहे. येथील शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक वारसा ही पुण्याची ओळख असून . पुणे हे आयटी आणि व्यवसायांचे हब आहे, त्यामुळे देशभरातून व्यावसायिक येथे आकर्षित होत असतात. भारतातील ऑटोमोटिव्ह उद्योगाचे देखील पुणे हे मोठे केंद्र आहे. भोपाळ ही मध्य प्रदेशाची राजधानी असून इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य यांचा अनोखा संगम येथे झालेला दिसतो. ‘तलावांचे शहर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोपाळमध्ये अनेक सुंदर तलाव आणि हिरवीगार उद्याने आहेत. सांस्कृतिक वैविध्याच्या बाबतीत भोपाळ समृद्ध आहे. येथे ताज-उल्-मस्जिद आणि भारत भवन सारखे अप्रतिम वास्तूकलेचे नमुने बघायला मिळतात.



उड्डाणांची संख्या वाढणार


पुणे-इंदूर, पुणे-चेन्नई आणि पुणे-रायपूर या मार्गांवर, इंडिगो दिवाळीच्या आधीच म्हणजे २७ ऑक्टोबर पासून आपल्या उड्डाणांची संख्या देखील वाढवणार आहे. या उड्डाणांचा उपयोग पुण्याहून आणि पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना तर होईलच, शिवाय देशातील नवीन जागांवर फिरण्यासाठीची आकर्षक संधी मिळेल.



उड्डाणांचे वेळापत्रक



  • ६E २५८ पुणे भोपाळ दररोज २७ ऑक्टोबर २०२४ १:०० २:३५

  • 6E २५७ भोपाळ पुणे दररोज २७ ऑक्टोबर २०२४ ३:०५ ४:५०

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि