मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस-२०२४ दरम्यान विशेष गाड्या चालवणार!

मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई/पुणे आणि नागपूर आणि नागपूर -भुसावळ - नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या (Special Railway) चालवणार आहे. जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक.




  • लोकमान्य टिळक टर्मिनस - नागपूर अनारक्षित विशेष


०१०१७ विशेष ११ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दुपारी २ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता पोहोचेल.


थांबे : ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी.


संरचना : १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.




  • नागपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष


०१०१८ विशेष गाडी १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथून रात्री १२ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पोहोचेल.


संरचना : ८ शयनयान (४ आरक्षित आणि ४ अनारक्षित), ४ द्वितीय चेअर कार, १ जनरेटर कार आणि १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन




  • नागपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष


०१२१८ विशेष नागपूर येथून १२ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी वाजता पोहोचेल.


संरचना : १० शयनयान (५ आरक्षित आणि ५ अनारक्षित) आणि ९ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.


०१०१८ आणि ०१२१८ साठी थांबे : सिंदी, सेवाग्राम (फक्त 01218 साठी), वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.



४) नागपूर - पुणे अनारक्षित विशेष
01215 विशेष गाडी दि. १२.१०.२०२४ रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.


01215 साठी संरचना: १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.


५) पुणे - नागपूर अतिजलद विशेष
01216 विशेष पुणे येथून दि. ११.१०.२०२४ रोजी १६.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल.


01216 साठी संरचना: ८ शयनयान (४ आरक्षित आणि ४ अनारक्षित), ४ द्वितीय सिटींग कार, १ जनरेटर कार आणि १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.


01215 आणि 01216 साठी थांबे : अजनी (फक्त 01216 साठी), सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन.



६) भुसावळ - नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष
01213 मेमू विशेष दि. १२.१०.२०२४ रोजी भुसावळ येथून ०४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.


01214 मेमू विशेष दि. १२.१०.२०२४ रोजी नागपूर येथून २३.४० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी १४.१० वाजता पोहोचेल.


संरचना: १२ कार मेमू


01213 थांबे: मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी.


01214 थांबे: सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड.


आरक्षण: 01216, 01018 आणि 01218 या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७.१०.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर उघडेल.


विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.


प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात