Saturday, November 9, 2024
Homeक्रीडामुंबईने २८ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!

मुंबईने २८ वर्षानंतर जिंकला इराणी चषक!

मुंबई : मुंबईने तब्बल २८ वर्षांनंनतर इराणी कपवर नाव कोरले आहे. शेष भारताविरूद्धचा हा सामना पाचव्या दिवशी ड्रॉ जाहीर करण्यात आला आणि पहिल्या डावातील आघाडीमुळे मुंबई संघ विजयी घोषित करण्यात आला.

पहिल्या डावात मुंबईची घसरलेली खेळी तनुष कोटियनने पुन्हा उभारण्यास सुरूवात केली आणि शतकापर्यंत मजल मारली. त्याला मोहित अवस्थीची साथ मिळाली व या दोन फलंदाजांनी मुंबईच्या विजयाचा रस्ता सुखकर केला. मुंबईचा डाव ढासळला असताना या दोघांनी मुंबईला नवसंजीवनी दिली आणि संघाला विजयापर्यंत घेऊन गेले.

मुंबईने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात तब्बल ५३७ धावा उभारल्या. या डावात सर्फराज खानने द्विशतक झळकावले होते. तर प्रत्युत्तरात शेष भारताने कडवी झुंझ देत ४१६ धावसंखेचा टप्पा गाठला. या डावात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने धमाकेदार कामगिरी केली.

मुंबईचा दुसरा डाव घसरत असताना सलामीवीर पृथ्वी शॉने अर्धशतक झळकावत मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु शेष भारताचा फिरकीपटू सारांश जैन मुंबईवर भारी पडला आणि त्याने मुंबईचा अर्धा संघ माघारी पाठवला. परंतु पहिल्या डावात अर्धशतक झळकावलेल्या तनुष कोटियनच्या शतकाने व मोहित अवस्थीच्या अर्धशतकाने मुंबईला विजयी घोषित केले.

मुंबईच्या दुसऱ्या डावात सलामीवीर पृथ्वी शॉ एका बाजूने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करत होता, तर दुसऱ्या बाजूने मुंबईचा डाव घसरत होता. त्याचा साथीदार आयूष म्हात्रेदेखील १४ धावांवर माघारी परतला. कर्णधार अजिंक्य रहाणेही अवघ्या ९ धावा करून परतला. तरीही पृथ्वी शॉ एकहाती खिंड लढवत होता. परंतु शेवटी ३४ व्या शतकात पृथ्वी शॉ देखील ७६ धावा करत सारांश जैनच्या गोलंदाजीवर बाद झाला. पृथ्वी शॉने ८ चौकार व एका षटकारासह १०५ चेंडूत ७६ धावा केल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -