Saturday, November 9, 2024
Homeताज्या घडामोडीHarshvardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांनी फुंकली तुतारी!

Harshvardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांनी फुंकली तुतारी!

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच आज भाजपामधील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, काल शरद पवार यांची आणि माझी सिल्वर ओकला बैठक झाली. त्यामध्ये शरद पवार मला म्हणाले इंदापूरमधील अनेक लोकांचे मत आहे की तुम्ही निवडणूक लढवा. त्यामुळे तुमच्या लोकांशी चर्चा करुन तुम्ही निर्णय घ्या, त्या पुढची जबाबदारी माझी, असे पवार आपल्याला म्हणाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच, शरद पवार यांच्याशी चर्चेअगोदर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे. त्या चर्चेत फडणवीस यांनी आपली अडचण समजून घ्या, असे म्हटल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -