Pune Helicopter Crash : भीषण अपघात! पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

पुणे : पुणे शहरातून (Pune) भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. पुण्यातील बावधान परिसरात खासगी हेलिकॉप्टर कोसळून (Helicopter Crash) ३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुणे जिल्ह्यातील बावधन परिसरात ही घटना घडली. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उड्डाण घेतलं होतं. हे उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या तीन मिनिटांत या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्ट आणि एचईएमआरएल ही या केंद्र सरकारच्या संस्थेदरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हेलिकॉप्टरला अपघात झाला. दुर्घटनेनंतर हेलिकॉप्टरला भीषण आग लागली असून परिसरातून धुराचे लोट पसरले होते.


दरम्यान, दाट धुक्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज असून या अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला. घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब दाखल झाले असून हिंजवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या नेतृत्वातील पथक या अपघाताची अधिक चौकशी करीत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी