स्फोट करून रेल्वे ट्रॅक उडवला

साहिबगंज : झारखंडच्या साहिबगंजमध्ये असामाजिकतत्त्वांनी स्फोट घडवून रेल्वे ट्रॅक उडवल्याची भीषण घटना साहिबगंजच्या लालमाटिया ते फरक्का एमजीआर रेल्वे मार्गावर घडली. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर रुळावर ३ फूट खोल खड्डा पडला आहे. रेल्वे ट्रॅकपासून सुमारे ३९ मीटर अंतरावर ट्रॅकचे तुकडे सापडले.


यासंदर्भात रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, साहिबगंज जिल्ह्यातील बरहेत पोलीस स्टेशन हद्दीतील रंगा घुट्टू गावाजवळ लालमटिया ते फरक्का हा एमसीआर रेल्वे मार्ग स्फोटकांनी उडवण्यात आला. अधिकाऱ्यांना घटनास्थळावरुन स्फोटकांचे सामानही सापडले आहे. घटनेची माहिती मिळताच झारखंड पोलीस, आरपीएफ आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या घातपातामागे नेमके कोण आहे याचा तपास केला जात आहे.


एफएलएलच्या टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. या घटनेची सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या रेल्वे मार्गाचा वापर कोळसा वाहतूक करण्यासाठी केला जातोया स्फोटाचा आवाज एमजीआर रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या गावातील लोकांनाही ऐकू आला. घटनास्थळी पोल क्रमांक ४२/०२ वर कोळसा भरलेली ट्रेन उभी होती. ट्रॅक उडवल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांपासून आसाममधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना नॅशनल संथाल लिबरेशन आर्मीचे लोक या भागात सक्रिय आहेत. या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी

‘राष्ट्रगीता’वरून तामिळनाडूत हाय व्होल्टेज ड्रामा

राज्यपालांचा सभागृहातून सभात्याग नवी दिल्ली : तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन

युएईच्या अध्यक्षांच्या तीन तासांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या दिल्ली दौऱ्याने भारत-यूएई संबंधांना

नदी पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्राचे मोठे पाऊल

देशातील पहिल्या राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे मंत्री पंकजा मुंडे यांनी केले सादरीकरण नवी दिल्ली :