Friday, May 9, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

Babar Azam: बाबर आझमने दुसऱ्यांदा दिला पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा

Babar Azam: बाबर आझमने दुसऱ्यांदा दिला पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज बाबर आझमने दुसऱ्यांदा कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबर पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार होता. याआधीही त्याने राजीनामा दिला होता. मात्र त्याला पुन्हा कर्णधार बनवण्यात आले होते. यावेळेस बाबरने वर्कलोडचे कारण सांगत पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. याशिवाय तो म्हणाला की त्याला आपल्या बॅटिंगवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.


२ ऑक्टोबरल बुधवारी बाबरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. बाबरने सोशल मीडियावर लिहिले, प्रिय चाहते, मी आज तुमच्यासोबत बातमी शेअर करत आहे. मी पाकिस्तानच्या पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.


 


बाबरने पुढे लिहिले, या संघाचे नेतृत्व करणे खरंच गौरवाची बाब आहे. मात्र आता वेळ आली आहे की मी हे पद सोडू आणि खेळण्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करू. नेतृत्व करण्याचा अनुभव मोठा आहे. मात्र त्यासोबतच कामाचा बोजाही वाढतो. मला खेळाला प्राथमिकता द्यायची आहे. मला माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे. तसेच कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळेच तर मला आनंद मिळतो.



वर्षभराच्या आत दोनदा कर्णधारपदाचा राजीनामा


वर्षाच्या आत दुसऱ्यांदा बाबरने कर्णधारपदाचा राजीनामादिला आहे. याआधी त्याने वनडे वर्ल्डकप २०२३ नंतर कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. वनडे वर्ल्डकपनंतर बाबरने १५ नोव्हेंबर २०२३ला कर्णधारपदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, त्यावेळेस बाबर पाकिस्तानच्या तीनही फॉरमॅटचा कर्णधार होता.

Comments
Add Comment