PM Narendra Modi : पंतप्रधानांचा ५ ऑक्टोबर रोजी असणार ठाणे दौरा!

अनेक रस्ते बंद; 'असे' असतील पर्यायी मार्ग


मुंबई : सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह (Amiyt Shah) दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. तर येत्या ५ ऑक्टोबरपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे देखील महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra) करणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत.


दरम्यान, पंतप्रधान मोदी ५ ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर असून ते ठाणे येथे रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत. यावेळी सुमारे ४० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे ठाण्यातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र प्रवाशांचा खोळंबा टळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले असून प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.



काय आहेत पर्यायी मार्ग?



  • गुजरात येथून ठाण्यात येणारी वाहने विक्रमगडमार्गे नवी मुंबई येथून मुंबईच्या दिशेने जातील.

  • नाशिक कडून येणारी वाहने मुरबाड मार्गे कल्याण येथून मुंबईचा दिशेने जाणार आहेत.

  • मुंबई कडून येणारी वाहने ऐरोली मार्गे कल्याण येथे जाणार आहेत.

  • नवी मुंबई येथून येणारी वाहने कल्याणमार्गे नाशिक आणि गुजरातच्या दिशेने जाणार आहेत.

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती