Raj Thackeray : मनसेचे नेते राज ठाकरे यांना झालंय तरी काय?

  512

दीपक मोहिते


मुंबई : मनसे (MNS) आगामी निवडणुकीत किती जागा लढवणार हे अद्याप निश्चित झाले नसले तरी पक्षाचे नेते राज ठाकरे (Raj Thackeray) हे गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्याचे दौरे करत आहेत. नाशिक व ठाणे जिल्ह्यात त्यांचा पक्ष फार नाही, पण एखाद दोन जगावर चांगली लढत देईल. पण त्यांना जागा जिंकणे, अशक्य आहे. या निवडणुकीसाठी (Assembly Election) राज ठाकरे हे सतत दौऱ्यावर आहेत,पण त्यांना अद्याप सूर सापडलेला नाही.त्यांच्या प्रचारात कुठेतरी वैचारिक गोंधळ निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत हेच राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिक व पुण्यात प्रचारात जाहीर सभा घेत होते. आज तेच राज ठाकरे महायुतीच्या कारभारावर ताशेरे ओढत सर्वत्र फिरताना दिसत आहेत, हा बदल म्हणावा कि वैचारिक गोंधळ,अशा संभ्रमावस्थेत मनसे सैनिकांसह मतदार देखील सापडले आहेत.


गेल्या दोन दिवसात त्यांनी महायुतीच्या " मुख्यमंत्री,माझी लाडकी बहीण" योजनेवर (Mazi Ladki Bahin Yojana) तोंडसुख घ्यायला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या चार महिन्यात त्यांच्यामध्ये झालेल्या या बदलामागे नक्की काय कारणे आहेत, हे कळायला मार्ग नाही. अशा परिस्थितीमध्ये ते "एकला चलो रे" भूमिकेत येऊन ही निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागतात,यामागे निश्चित एक रणनिती असावी.


लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने केलेली नेत्रदीपक कामगिरी लक्षात घेऊन शिंदे गट व भाजपने त्यांना स्वबळावर ही विधानसभा लढवण्यास भाग पाडले असावे. उद्धव ठाकरे यांना मिळणाऱ्या मराठी माणसाच्या मतांवर डल्ला मारण्यासाठी राज याना त्यांनी या निवडणुकीत उतरवले असावे,अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कारण काल परवापर्यंत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस,प्रसाद लाड,आशिष शेलार,प्रवीण दरेकर,हे राज ठाकरे यांच्या इमारतीच्या गॅलरीत अधून मधून पाहायला मिळत होते.तेच राज ठाकरे आता लाडकी बहीण योजनेवरून शिंदे सरकारवर आगपाखड करू लागले आहेत.याला आपण त्यांचा वैचारिक गोंधळ म्हणायचं कि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अपशकुन करण्याची भाजप व शिंदे गटांनी आखलेली रणनिती समजायचे ? असा प्रश्न मतदारासमोर उभा ठाकला आहे.

Comments

Satish Marotrao Samarth    September 29, 2024 04:46 PM

He is Raj Thakeray. He is doing the right kind of Politics, which is very rare in present worst Political scenario. He praises the good deeds and criticizes the bad deeds. He is representing common man. The common man who is expecting focus on primary problems like Employment, Pollution, and many more. He has shown through his Blue print, what he is happening and what people are expecting from Politics. Agree with him or not, is not his problem, It's Yours. Thanks.

Add Comment

Dadar Kabutar Khana Controversy: कबुतर खानाच्या राड्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले "लोकांचे आरोग्य..."

मुंबई: मुंबईतील दादरमधील कबुतरखाना बंद करण्यावरून जैन समाज आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुंबई उच्च

हत्तीण आणि कबुतरखाना प्रकरणात मनसेचा यू टर्न

मुंबई : न्यायालयाच्या आदेशामुळे मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याची कारवाई महापालिकेने सुरू केली आहे. तसेच

जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसावर खटला

मुंबई : जयपूर-मुंबई सेंट्रल एक्स्प्रेस रेल्वेत गोळीबार आणि हत्या प्रकरणात बडतर्फ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी

Dadar Kabutar Khana : प्रार्थना संपली... आता प्रतिकार! कबुतरखान्यावर जैन समाज संतप्त, पोलिसांसोबत बाचाबाची

मुंबई : मुंबईतील कबूतरखाना परिसर पुन्हा एकदा तणावाच्या वातावरणात सापडला आहे. जैन समाजाने यापूर्वी जाहीर केलेले

मुंबईचा प्रारूप प्रभाग रचना आराखडा अखेर नगरविकास खात्याला सादर

प्रभाग रचना जुन्याच पद्धतीने, पण घातली विकास आराखड्याची सांगड मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

तुकाराम मुंढेंची २३वी बदली दिव्यांग कल्याण विभागात

मुंबई  : राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त तुकाराम