Mumbai News : मुंबईकरांचा पाणी प्रश्न सुटला! पाणीपुरवठा करणारी धरणं काठोकाठ भरली

Share

मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसानेही धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असणारे धरणे,नदी-नाले तुडुंब भरले गेले आहेत. तसेच मुंबई शहराला पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या सर्व धरणे देखील काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी प्रश्न सुटणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा १०० टक्क्यांजवळ पोहचला आहे. आज सकाळी ६ वाजता या जलाशयांमधील पाणीसाठा १४,३९,२७१ दशलक्ष लिटर इतका झाला. म्हणजेच एकूण ९९.४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वर्षभरासाठीचा पाणीप्रश्न मिटला आहे.

कोणत्या धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा?

  • अप्पर वैतरणा – ९९.७९ टक्के पाणीसाठा
  • मोडक सागर – १०० टक्के पाणीसाठा
  • तानसा – ९९.५८ टक्के पाणीसाठा
  • मध्य वैतरणा – ९८.७९ टक्के पाणीसाठा
  • भातसा – ९९.३५ टक्के पाणीसाठा
  • विहार – १०० टक्के पाणीसाठा
  • तुलसी – १०० टक्के पाणीसाठा

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

7 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

30 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago