Sunday, October 6, 2024
Homeताज्या घडामोडीकेरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्यांना सजग राहण्याचे निर्देश

केरळमध्ये आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण; केंद्र सरकारकडून राज्यांना सजग राहण्याचे निर्देश

नवी दिल्ली : केरळमध्ये मंकीपॉक्सचा (monkeypox) दुसरा रुग्ण आढळला आहे. भारतातील मंकीपॉक्सची ही तिसरी घटना आहे. २९ वर्षीय तरुण युएईमधून केरळमधील एर्नाकुलम येथे परतला होता. त्याला खूप ताप होता. तपासणीत मंकीपॉक्सची पुष्टी झाली. या स्ट्रेनची अद्याप ओळख पटलेली नाही.

केरळच्या आरोग्य विभागाने सांगितले की, रुग्णावर कोची येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे जीनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणीनंतर, रुग्णाला मंकीपॉक्सच्या धोकादायक आणि वेगाने पसरणाऱ्या क्लेड १ स्ट्रेनचा संसर्ग झाला आहे की नाही हे कळेल.

मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादुर्भावाविषयी केंद्र सरकारकडून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना जनजागृतीसाठी सूचना

भारतात ‘मंकीपॉक्स क्लेड १बी’चा नवीन रुग्ण आढळल्याने, भारत हा आफ्रिकेबाहेरील तिसरा देश ठरला आहे, ज्यात या प्रकारचा रुग्ण आढळला आहे. यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स विषाणूच्या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने मंकीपॉक्स संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी रोग प्रतिबंधक उपाययोजना कडकपणे राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चाचणीसाठी ठरवलेल्या प्रयोगशाळांची यादी देखील दिली आहे. जारी केलेल्या निर्देशामध्ये रुग्णालयीन व्यवस्थापन, रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृतीसाठी विशेष धोरणांचा समावेश केला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या मते, १४ ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकीपॉक्स विषाणूच्या प्रादूर्भावाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणिबाणी म्हणून घोषित केले आहे. २००५च्या आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार भारत या घोषणेचा भाग आहे.

राज्य सरकारांना आरोग्य सुविधांमध्ये तयारीची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य व जिल्हा स्तरावर ही आढावा बैठक घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

मंकीपॉक्स क्लेड १ चे लक्षणे क्लेड २ सारखीच असली तरी, क्लेड १ मध्ये जटिलतांचा धोका अधिक असल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -