मुंबई : सध्या अनेक तरुण बँकेत काम (Bank Job) करण्याची संधीच्या शोधात असतात. अशाच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय निर्यात-आर्यात बँक (EXIM Bank) मध्ये ऑफिसर पदासाठी भरती जारी करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून भरघोस पगारदेखील मिळणार आहे. त्यामुळे बँकेत ऑफिसर होण्याची इच्छुक असणाऱ्यासांठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
एक्झिम बँकेतील ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना एक्झिम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावे लागणार आहे. या नोकरीसाठी एकूण ८८ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. तर १४ ऑक्टोबर २०२४ या तारखेपर्यंत उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. २७ ते ६५ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज करणारे उमेदवार बॅचलर डिग्री, मास्टर डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री किंवा एमबीए पदवी प्राप्त असणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही वर्षांचा अनुभव असावा. अनुभवानुसार उमेदवारांची योग्य पदासाठी निवड केली जाणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी समिती तयार केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्टिंग करुन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…